मंजूर झालेला २५% पीकविमा शेतकऱ्यांना तात्काळ द्या-नुमान चाऊस


कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी तात्काळ लक्ष घालावे !

माजलगाव/प्रतिनिधी

Advertisement

बीड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन,कापसाची लागवड खरीप मध्ये केली होती व प्रतिकूल हवामाना मुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.सविस्तर वृत्त असे की,लागवडी वेळी शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता. व २५ टक्के पिक विमा मंजूर ही झाला होता.पिकांचे नुकसान होऊनही दोन महिने उलटून गेले तरी आतापर्यंत अनेक मंडळाच्या शेतकऱ्यांना अग्रीम भेटलेला नाही व शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारल्यावर उडवा-उडवीचे उत्तरे देण्यात येत आहेत. दिवाळीमध्ये अनेक अडचणी असल्याचे कारण देत प्रोसेसनुसार अग्रीम येणार असल्याच्या भूलथापा देत जिल्ह्यातील लाखांहून अधिक शेतकरी अग्रिम पान्सून वंचित ठेवण्याचे काम सरकार व कंपनीकडून करण्यात आले.तरी ज्या ज्या मंडळाच्या शेतकऱ्यांना आतापर्यंत अग्रीम मिळालेला नाही, त्यांना लवकरात लवकर २५% अग्रीम पीक विमा देण्यात यावा अशी मागणी मौलाना आझाद युवा मंचचे जिल्हा अध्यक्ष नुमान अली चाऊस यांनी प्रसिद्धीपत्रका द्वारे केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!