आ.मुंदडांचे प्रयत्न सफल ; मतदार संघातील विकासकामांसाठी अर्थसंकल्पात ३१८ कोटींची तरतूद !
न भूतो न भविष्याती निधीमुळे केज मतदारसंघ वेगवान विकासाच्या प्रगतीपथावर
अंबाजोगाई/प्रतिनिधी
हिवाळी अधिवेशनाच्या अर्थसंकल्प पुरवणी मागणीतून केज विधानसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा निधीचा वर्षाव झाला आहे.आ. नमिता मुंदडा यांच्या आग्रही पाठपुराव्यानंतर अर्थसंकल्पातून केज मतदार संघाच्या विकासासाठी तब्बल ३१८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.विशेष म्हणजे लोखंडी सावरगाव ते माळेगाव या पालखी मार्गाच्या सिमेंट कॉंक्रीटकरणासाठी तब्बल २२३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मागील वर्षभरात मिळालेल्या जवळपास एक हजार कोटींच्या निधीमुळे केज मतदार संघाची प्रगतीपथावर घोडदौड सुरु आहे.
लोकप्रतिनिधी कर्तबगार असल्यानंतर विकास प्रक्रिया किती वेगवान होते याची प्रचीती सध्या केज मतदारसंघातील नागरिकांना येत आहे. मागील वर्षभरात आ.नमिता मुंदडा यांनी मतदार संघातील विकासकामांसाठी प्रयत्नपूर्वक जवळपास एक हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे.या निधीतून शहरी आणि ग्रामीण भागातील लहान-मोठे रस्ते,विविध कार्यालये,देवस्थाने, पर्यटनस्थळे, रुग्णालये आदींचा विकास वेगाने सुरु आहे.त्यानंतरही आ.मुंदडा यांनी मतदार संघातील इतर विकासकामांसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला आहे.आ. मुंदडा यांची कामाची धडाडी आणि कार्यतत्परता लक्षात घेत राज्य सरकारने पुन्हा एकदा केज मतदार संघावर निधीचा वर्षाव केला आहे.हिवाळी अधिवेशनाच्या अर्थसंकल्प पुरवणी मागणीतून केज विधानसभा मतदार संघातील विकास कामांसाठी तब्बल ३१८ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.यामध्ये मतदार संघातील ग्रामीण भागातील २१ रस्त्यांसाठी ४० कोटी रुपये, अंबाजोगाई शहरातील मुख्य रस्त्यावरील नाल्या आणि शासकीय जागांच्या संरक्षण भिंतीसाठी ५५ कोटी रुपये आणि लोखंडी सावरगाव ते माळेगाव या रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रीट रस्त्यासाठी २२३ कोटी ६० लाख रुपये असे एकूण ३१८ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे.हा भरीव निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे,बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांचे आ.नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत.
——–
ग्रामीण भागातील या २१ रस्त्यांची होणार सुधारणा
अर्थसंकल्पात केज मतदार संघातील चिखलबीड – जिवाचीवाडी- लव्हरी- कानडीमाळी ते केज (२ कोटी), नांदुर ते फकराबाद रस्ता (१.२५ कोटी), प्रजीमा-18 ते देशपांडे (लोंडे वस्ती) (१.५० कोटी), जवळबन ते सावळेश्वर रस्ता (२.५०), आनंदगाव ते भाटुंबा रस्ता (७५ लाख), प्रजीमा-76 ते जोला रस्ता (१ कोटी), चनई – सनगाव – कोद्री रस्ता (३.७५ कोटी), धनेगाव – नायगाव – आपेगाव – देवळा रस्ता (२ कोटी), सोनवळा ते भावठाना रस्ता (२ कोटी), भावठाना ते धावडी रस्ता (१.५० कोटी), रा.मा.२३२ ते धावडी रस्ता (१.२५ कोटी), युसुफवडगाव ते लामतुरे वस्ती रस्ता (१ कोटी), देवगाव ते रेणुकामाता मंदिर रस्ता (५० लाख), भाटुंबा ते जवळबन रस्त्यावरील पुलाचे बांधकाम करणे (२ कोटी), वाघबाभूळगाव ते मुंडेवाडी रस्ता (५० लाख), आंधळेवाडी ते विडा रस्ता (१.५० कोटी), चिंचोलीमाळी – सारूकवाडी – डोका ते हदगाव रस्ता (२ कोटी), बनसारोळा ते सावळेश्वर रस्ता (१ कोटी), प्रजीमा – 18 ते रानबाची वाडी रस्ता (१.५० कोटी), पिराचीवाडी – दहिफळ – आंबळाचे बरड ते शिरूरघाट (८ कोटी), धोत्रा ते माळेवाडी रस्ता (२.५० कोटी) या २१ रस्त्यांसाठी एकूण ४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
———–
मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील
स्व.विमलताई मुंदडा यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन केज मतदार संघातील शहरीसह ग्रामीण भागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील आहे.लवकरच इतर विकासकामांसाठीही निधी उपलब्ध शक्यता आहे.आ.नमिता मुंदडा
केज विधानसभा मतदार संघ