मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तहसीलवर धरणे आंदोलन !


माजलगाव/प्रतिनिधी

शेतकरी,शेतमजूर कामगारांच्या विविध प्रश्नावर (दि.२७ व २८ नोव्हेंबर २०२३ ला) मुंबई मध्ये दोन दिवसीय मुक्कामी आंदोलनास शासनास परवानगी नाकारल्याने आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली विविध संघटनानी आक्रमक भूमिका घेत (दि.३०) नोव्हेंबर २०२३ रोजी माजलगाव तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन केले.

.

Advertisement

यावेळी शासनाचा निषेध करत शेतकरी, शेतमजूर,कामगार कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कॉ.मुसद्दिक बाबा,कॉ.दत्ता डाके कॉ.एड.सय्यद याकुब,कॉ.मोहन जाधव, कॉ.कृष्णा सोळंके,यांच्या नेतृत्वाखाली माजलगाव तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.दुष्काळी परिस्थितीत सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पीक कर्ज माफ करा,अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करा,पीक विम्याची सर्व भरपाई रक्कम त्वरित वाटप करा,सन २०२० च्या पीक विम्याचा प्रलंबित प्रश्न निकाली काढा.दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयाची मदत करा, उसाला प्रती टन चार हजार भाव द्या,शालेय पोषण आहार योजनेतील कर्मचाऱ्यांना १८ हजार रुपये वेतन द्या व १२ महिने सेवा गृहीत धरून पूर्ण वेतन द्या,आशा वर्कर व गट प्रवर्तकाचा मानधन वाढीचा जीआर त्वरित लागू करा,बांधकाम कामगारांचे लाभाचे अर्ज तात्काळ मंजूर करा, रेशन दुकानदारांची चौकशी करून भ्रष्टाचारी दुकानांचे परवाने काढून घ्या,लाभार्थी कुटुंबांना मोफत धान्याचे किट नियमानुसार वाटप करा.इत्यादी घोषणा देत निदर्शने करून माकप,डीवायएफआय शेतमजूर संघटना, किसान सभा, शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना,इत्यादी संघटनांकडून धरणे आंदोलन करण्यात आले.

धरणे आंदोलनात विनायक चव्हाण,बळीराम भुंबे,अशोक पोपळे,सुहास झोडगे,रुपेश चव्हाण,विद्या ताई कुरे,सारिका नवले,सय्यद रज्जाक,शांतीलाल पट्टेकर,विजय राठोड, रफीक शेख,फारुख अण्णा,बाबा,दत्ता पवार, रोहिदास जाधव इत्यादींनी सहभाग घेतला.या वेळी तहसीलदार यांना वरील मागण्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!