संभाजी ब्रिगेडच्या वर्धापनदिनी वाशिम येथे हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा-विजय दराडे


माजलगाव/प्रतिनिधी

वाशिम येथे संभाजी ब्रिगेड राजकीय पक्षाचा वर्धापन दिन (दि.२)डिसेंबर २०२३ रोजी साजरा होणार आहे.या वर्धापनदिनी प्रदेश अध्यक्ष मनोज आखरे,महासचिव सौरभ खेडेकर मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते गंगाधर बनबरे हे मार्गदर्शन करणार आहेत.संभाजी ब्रिगेड संघटनेच्या रूपाने मागील तीस वर्षा पासून सक्रिय काम सुरु असून सन २०१६ साली संभाजी ब्रिगेड ने राजकारणात प्रवेश करत अनेक निवडणुका लढल्या, सन २०१९ ला ४० च्या वर विधानसभा ताकतीने लढवल्या, ग्रामपंचायत स्तरावर अनेक नवीन तरुणांना राजकारणात संधि उपलब्ध करून दिली,सदय परस्थिति मधे आजोबा,पुतन्या,नातू अशे राजकारण सुरु असून सर्व सामान्य माणसाला संधि कुणी देत नसल्याने संभाजी ब्रिगेड ने नवी दिशा देण्याच काम या महाराष्ट्रात केले आहे.

Advertisement

सर्व जाती धर्मला सोबत घेऊन सर्व धर्म सम भाव शिकवण देणार पक्ष म्हणून संभाजी ब्रिगेड ला ओळखले जाते, वाशिम येथील वर्धापन दिन पुढे येणाऱ्या नगरपालिका,जिल्हा परिषद नकवडनुका चे रणसिंग फुंकनार आहे,बीड जिल्ह्यातील सर्व कार्यक्रत्यानी हजारो च्या संखेने उपस्थित रहानेचे आव्हाहन संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष विजय दराडे यांनी केले आहे,वर्धापन दिन वाशिम येथे (दि.२) डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता वाटाने लॉन येथे होणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!