शेतकऱ्यांची अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई द्या-शेख रशिद
धरणात पाणी सोडा,पीकविमा द्या,मराठा आंदोलकांचे खोटे गुन्हे मागे घ्या यासाठी एमआयएम तिव्र निदर्शने करणारं
माजलगाव/प्रतिनिधी
Advertisement
जिल्हात झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले.या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून तातडीने सरसकट नुकसान भरपाई करा तसेच जायकवाडीचे पाणी माजलगाव धरणात तात्काळ सोडा,पीकविमा द्या व मराठा आंदोलकांचे खोटे गुन्हे मागे घ्या ह्यासाठी माजलगाव एमआयएम पक्षातर्फे उपविभागीय कार्यालयासमोर तिव्र निदर्शने करणार अशी माहिती एम आय एम शहराध्यक्ष शेख रशिद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.