उग नव माय काकाजी म्हणतात….
दोन वर्षापासून कुंबेफळ येथील शेतातील डीपीचा रेंगाळलेला प्रश्न काकाजींनी लावला मार्गी
केज : प्रतिनिधी
दोन वर्षापासून सतत अनेक कारणाने रेंगाळत असलेला डीपीचा प्रश्न केज विधानसभा मतदारसंघाच्या आ.नमिता मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा यांच्या निदर्शनास आणून दिल्याने व पाठपुरावा केल्याने नंदकिशोर मुंदडा यांनी कुंभेफळ येथील ठाकरपट्टी या शेतातील डीपीचा प्रश्न मार्गी लावून एक महिन्यात नवीन डीपी मंजूर करून बसवून दिला.
सविस्तर माहिती की,कुंभेफळ तालुका केज येथील ठाकरपट्टी येथील शेतातील शेतकऱ्यांना दोन वर्षापासून सतत शेतात लाईट नसल्यामुळे आपले रब्बीचे पीक वाळून जाताना दिसत होते.तसेच त्या भागात शेतकऱ्यांच्या जनावरांना पाण्यासाठी देखील आठ-आठ दिवस लाईट उपलब्ध होत नव्हती.शेतकरी सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने त्रस्त असतो दोन वर्षापासून त्या शेतकऱ्यांनी वेळोवेळी शासकीय अधिकाऱ्यांना कळवून देखील त्यांना लाईट मिळत नाही मात्र शेतकऱ्यांनी गावातील सुरेश थोरात यांना ही माहिती कळवली व त्यांच्या मार्फत शेतकऱ्यांनी आ.नमिता मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा यांना आपण दोन वर्षांपासून लाईट विना पिके काढू शकत नाही.ही आपबीती सांगितली त्यानंतर मुंदडा यांनी आ.नमिता मुंदडा यांच्या पत्राआधारे जिल्हा नियोजन समिती मार्फत डीपी मंजूर करून एक महिन्याच्या आत शेतकऱ्यांना डीपी बसवून लाईट चालू करून दिली.त्यामुळे त्या डीपीवरील वीस ते पंचवीस शेतकरी व त्यांची कुटुंबे यांनी आ.नमिता मुंदडा व नंदकिशोर मुंदडा यांचे आभार मानले.
आम्ही सतत दोन ते अडीच वर्षापासून शासकीय अधिकारी अभियंता व अन्य पुढार्यांकडे जाऊन वेळोवेळी डीपीची मागणी केली.दोन वर्षापासून आमच्या शेतात लाईट नव्हती,त्यामुळे आम्ही दोन वर्ष पासून रब्बी पिकापासून वंचित होतो.तसेच आमचे जनावरे देखील पाण्याविना कधी कधी तडफडत होती. मात्र एके दिवशी नंदकिशोर मुंदडा यांना आम्ही आमची मागणी केल्यानंतर त्यांनी एक महिन्यात आम्हाला नवीन शंभर चा डीपी बसवून चालू करून दिला.
शेख वाजेद
कुंभेफळ ता.केज

