हातावर नाव लिहून महिला डॉक्टरनं संपवलं जीवन !


चार वेळा बलात्कार करुन छळ

बीड : प्रतिनिधी

सातारा : फलटण शहरातील उपजिल्हारु ग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने शहरातील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मृत डॉक्टरने आत्महत्येपूर्वी तिच्या तळहातावर सुसाइड नोट लिहिली असून, त्यात तिने दोन पोलिस अधिकाऱ्यांवर बलात्कार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत.

Advertisement

डॉक्टर महिलेने सुसाइड नोटमध्ये म्हटलं आहे की पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांनी तिच्यावर वारंवार बलात्कार केला होता. तसेच पोलीस अधिकारी प्रशांत बनकर यांनी तिचा सलग चार महिने मानसिक छळ केला होता. या घटनेनंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. महिलेच्या हातावरील सुसाइड नोटची आता फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे. दुसऱ्या बाजूला या घटनेने नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण असून दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. फलटणमधील या घटनेने महाराष्ट्र हादरला असून नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेले पोलीसच बलात्कार करत असतील तर जनतेने कोणाकडे पाहायचं? असा प्रश्न शिवसेनेच्या (उबाठा) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. तसेच राज्याचा गृहविभाग झोपलाय की काय? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

सुसाइड नोटमध्ये काय लिहिलंय ?

“माझ्या मरण्याचे कारण पोलीस निरीक्षक गोपाळ बदने ज्याने माझा पाच वेळा बलात्कार केला आणि प्रशांत बनकर ज्याने मागील पाच महिन्यांपासून माझा शारीरिक व मानसिक छळ केला.”

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!