दसरा मेळाव्यास उपस्थित रहावे-सुरज घुले
केज : प्रतिनिधी
सावरगाव घाट (ता. पाटोदा) येथे भगवान भक्ती गडावरील पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या दसरा मेळाव्यास हजाराच्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे युवा नेते सुरज भैय्या घुले यांनी केले. मुंडे यांनी आयोजीत केलेला दसरा मेळावा हा ऐतिहासिक होत असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या मेळाव्याकडे लागलेले असते.
राष्ट्रीय संत श्रीभगवान बाबा यांच्या जन्मभूमीत दसरा मेळाव्यात पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे ह्या मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याचे साक्षीदार होण्यासाठी सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे. दसरा मेळावा हा कोणत्या राजकीय पक्षाचा नसून, दसरा मेळाव्याचे मुख्य प्रयोजन समाजातील उपेक्षित, शोषित, न्याय वंचितांच्या हक्कासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. त्यामुळेच हा केवळ मेळावा नसून, एक सामाजिक चळवळ आहे. त्यामुळे या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपचे युवा नेते सुरज रामकृष्ण घुले यांनी केले आहे. मेळाव्याची जय्यत तयारी केली जात आहे.

