औसा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निवेदन
दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी
औसा तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी तसेच तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.या वेळी जिल्हा कार्याध्यक्ष रशीद शेख, युवक जिल्हाध्यक्ष भरत सूर्यवंशी, विधानसभा अध्यक्ष यशवंत भोसले, विधानसभा युवक अध्यक्ष अशोक गरड,तालुका अध्यक्ष शामराव साळुंके, शहराध्यक्ष सन्नाउल्ला शेख, युवक तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, युवक शहराध्यक्ष मारूफ शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. नेत्यांनी शासनाने तत्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत, पीकविमा भरपाई आणि शेतीसाठी पाणी व वीज पुरवठ्याच्या सोयी उपलब्ध करून द्याव्यात, अशी ठाम मागणी यावेळी केली.

