वाढदिवस साजरा न करण्याचा खा.सोनवणेंचा निर्णय
बालकांची आरोग्य तपासणी करून घेण्याचे खा.सोनवणेंचे आवाहन
बीड : प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच कै.संतोष अण्णा देशमुख यांचे दुर्दैवी दु:खद निधन, बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याही मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत तसेच अपघातामधे युवकांचे निधनही झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, आज वाढदिवस साजरा करणार नसल्याचा निर्णय खा.बजरंग सोनवणे यांनी जाहिर केला आहे.
दरवर्षी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमूख यांची निर्घृण हत्या झालेली आहे, यामुळे संपूर्ण जिल्ह्यात दु:ख व्यक्त केले जात आहे. या घटनेचे माझ्याही मनात मोठे दु:ख आहे. यामुळे वाढदिवस साजरा करणे मनाला पटत नाही. त्यामुळे या वाढदिवसी, हारतूरे, पुष्पगुच्छ टाळून रक्तदान, कृत्रिम अवयवदान शिबिरे व इतर सामाजिक उपक्रमांसोबत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ० ते १८ वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी होणार आहे. या सर्वच समाजोपयोगी उपक्रमांमधे अधिकाधिक सहभागाची नोंद होईल यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूया. आपल्या शुभेच्छा सोशल मिडियातून मिळाल्या तरी मला आनंद वाटेल, असेही खा.बजरंग सोनवणे यांनी जाहिर केले आहे.