माजलगाव शहर पोलिसांचा दत्त किराणा दुकानावर छापा
६४,६०० रुपयाचा गुटखा सुगंधी पान मसाला जप्त
किराणा चालक भारत उत्तमराव होके या इसमावर गुन्हा दाखल
माजलगाव : प्रतिनिधी
माजलगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई सुनील गवळी हे दि.२९/५/२०२५ रोजी पोलीस स्टेशन येथे हजर असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, भारत उत्तमराव होके हा इसम पावर हाऊस रोड माजलगाव येथे असलेल्या दत्त किराणा दुकानात गुटखा साठवणूक करून त्याची विक्री करीत आहे.सदरची माहिती वरिष्ठांना कळवत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप राठोड, सुनील गवळी, तोटेवाड यांनी गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या ठिकाणी दत्त किराणा दुकानावर ७:२० वा. छापा मारला असता सदर दुकानावर एक इसम मिळून आला. नामे भारत उत्तमराव ठोके वय ३० वर्षे रा. पाटील गल्ली माजलगाव ता. माजलगाव जि. बीड हा मिळून आला. सदर किराणा दुकानाची झडती घेतली असता या दुकानांमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधी पान मसाला एका निळ्या रंगाच्या गोणीमध्ये DIRECTOR SPECIAL PAN MASALA असे नाव असलेले सोनेरी रंगाचे ५० कागदी बॉक्स प्रति बॉक्स किंमत २५२ रुपये अशी असून किंमत १२,६०० रुपये, तसेच गोवा १००० गुटखा असे नाव असलेले २६० पुढे प्रति पुढे किंमत २०० रुपये किंमत ५२,००० रुपये असा एकूण ६४,६०० रुपयाचा मुद्देमाल मिळून आला.
भारत उत्तमराव होके या इसमास ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता सदरचा माल हा पाथरूड येथील नयुम याच्याकडून सदरचा माल घेतला असल्याचे सांगितले.दि.२९/५/२०२५ रोजी ७:२० वा. इसम नामे भारत उत्तमराव होके हा स्वतःच्या फायद्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा सुगंधी स्वादिष्ट पान मसाला यावर बंदी असताना साठवून ठेवल्यामुळे त्याच्यावर भा.न्या.सं. १२३, २२३, २७४, २७५, ३(५)नुसार माजलगाव शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई नवनीत कॉवत पोलीस अधीक्षक बीड,श्रीमती चेतना तिडके अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई, श्री.चोरमले साहेब सहाय्यक पोलीस उपविभागीय अतिरिक्त पदभार माजलगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ,पोलीस उपनिरीक्षक संदीप राठोड,पो. हे.कॉ.माधव तोटेवाड,पो.शि. सुनील गवळी यांनी केली.