रामकृष्ण हरी….
महाराष्ट्र मधील लोकप्रिय भागवताचार्य आणि सुप्रसिद्ध कीर्तनकार आपल्या गावचे भूमीपुत्र ह.भ.प.प्रमोद महाराज पवार सध्या चंदनसावरगांवनगरी मध्ये नुकताच मोठ्या उत्साहात दक्षिण मुखी हनुमान मंदिरा मधील अनेक वर्षा पासून सुरु असलेला सप्ताह पुर्ण झाला (सप्ताह ची सुरुवात कधी पासून झाली याची माहिती कोणीच वयस्कर माणूस सांगू शकत नाही एवढा जुना सप्ताह आहे ) आणि या सप्ताह मध्ये मोलाची भूमिका असलेल्या आणि सर्व युवकांना एकत्रित करून ज्यांनी एकमेकांना स्नेहाच्या ऋणानुबंध मध्ये बांधून ठेवले असेलेले श्री प्रमोद महाराज पवार यांनी सुरुवाती पासूनच अध्यात्म, परमात्म या वारकरी सांप्रदाय मध्ये आपले प्रभुत्व स्वतःच्या कर्तृत्वावर सिद्ध करून दाखविले आहे. आणि सुरुवातीच्या काळापासून अगदी मृदंगाचार्य पासून भागवताचार्य या प्रवासाचे आपण सर्व साक्षीदार आहोत. आज एवढ्याच वर श्री प्रमोद महाराज यांची ओळख थांबत नाही सध्या महाराष्ट्र मधील कानाकोपऱ्यात तसेच सध्याच्या युगात प्रसार माध्यम असलेले ‘Zee टॉकीज’ , ‘शेमारो मराठी बाणा’, स्टार प्रवाह या सारख्या लोकप्रिय TV चॅनल वर महाराजांचे किर्तन रुपी सेवा होत आहेत. अनेक श्रोतेगण महाराजांच्या संपर्क मध्ये परमार्थिक दृष्ठ्या वारकरी संप्रदाय कडे ओढले जात आहेत खास करून युवक वर्ग आणि अनेक युवकांना व्यसन मुक्त होण्यास महाराजांनी प्रेरणा दिली आहे असे अनेक तरुणांच्या चर्चा मधून आज आपल्याला ऐकायला मिळते. यातूनच त्यांनी काही वर्षा पासून आयोध्या, द्वारका, चित्रकूट, काशी,मथुरा,चारधाम यात्रा,ह्या सारख्या हिंदू धर्मातील पवित्र धार्मिक पर्यटन स्थळ ला आपल्या भागातील पंचक्रोशी मधील भाविक भक्तांना घेऊन अगदी कमी खर्चात चांगले सुयोग्य नियोजन व त्या तीर्थक्षेत्र दर्शनाची संधी या पवित्र यात्रा चे सुरुवात करून उपलब्ध करून दिली आहे. आणि बघता बघता ह्या कौतुकास्पद यात्रा सुरुवात करून या यात्रा ला आज मोठं व्याप्त स्वरूप प्राप्त झाले आहे. सर्व प्रथम तर या यात्रा सुरुवात करण्या मुळे आपल्या भागातील भाविकांना ती संधी उपलब्ध करून दिली हेच मोठं कार्य आहे. कारण सर्व असते परंतु तो वेळ आणि नियोजन नसल्याने यात्रा अर्धवट राहतात. आपण ह्या यात्रा चे माध्यम झालात आणि मोठी संधी पंचक्रोशी मधील भाविकांना महाराजांनी उपलब्ध करून दिली आहे.कितीही कुणी नाकारलं तरी आपल्या गावातील महाराज असल्याने हे अभिमानास्पद आहे याची दखल घेण्यासारखी गोष्ठ आहे. अहो साधं बीड मधून कैज ला यायचं म्हणलं तर वेळेवर गाडी नाही आली तर तास भर स्टॅन्ड मध्ये बसाव लागतंय हिथे राज्याच्या सीमा ओलांडून आपल्या माणसाचे नियोजन करणे एवढं नक्कीच सोप्प नाही.
सध्या ची पुर्ण झालेली यात्रा व चार धाम यात्रसध्या ची पुर्ण झालेली यात्रा व चार धाम यात्रा
हिंदू संस्कृतीमध्ये चारधामला खूप महत्त्व आहे. तसेच चित्रकूट, प्रयागराज, काशी, आयोध्याया आणि चारही धामाच्या यात्रा श्री. प्रमोद महाराज पवार यांनी दरवर्षी आयोजित केलेल्या असतात. खरं तर ही बाब खूप मोठी आहे की आपल्या परिसरामधीलच भाविकांना कुठल्याही पद्धतीने या हिंदूंच्या पवित्र धार्मिक स्थळाचे यात्रा आयोजित केली जात आहे. खास करून या यात्रेच माध्यम नसतं आणि हेच माध्यम पवार महाराजांनी हेरलं आणि ह्या यात्रेची सुरुवात केली. प्रयागराज काशी चित्रकूट आणि आयोध्या या यात्रेची सांगता नुकतीच झाली परंतु यावर्षी चे नियोजन आणि व्यवस्थापन पाहून अनेक इच्छुकाना पुन्हा यात्रा मध्ये जावेसे वाटत आहे. सध्या पुर्ण झालेल्या यात्रा मध्ये खास करून या यात्रेमध्ये पंचक्रोशीतील तसेच विविध भागांमधील ज्येष्ठ मंडळी सुद्धा या यात्रेमध्ये सामील झाली होती. या यात्रेला सुरुवात करून अनेक वर्ष झालेली आहेत. आणि आज या यात्रेला आपल्या भागात एक व्याप्त स्वरूप प्राप्त झाले आहे. माघील काही वर्षा पासून या यात्रा च्या नियोजन मध्ये सुधारणा आणि व्याप्ती वाढत आहे जी भाविकांना आपल्या कडे भागातील एकमेव नियोजन बद्ध यात्रा ची नियोजन केले गेले.व्यवस्थित असलेले नियोजन, आजवरचा यात्रेंचा अनुभव, प्रशस्त असलेले प्रशासन व्यवस्था, यात्रेदरम्यान यात्रेकरूंना असलेल्या सुख सुविधा तात्काळ घटनांवर प्रथम उपचाराची सुविधा, प्रत्येक यात्रेकरूची राहण्याची व्यवस्था, प्रत्येक यात्रेकरूचे दळणवळणाची सुविधा, यात्रा मधील भाविकांच्या मेडिसिनचा व्यवस्था, या सर्व गोष्टी पवार महाराजांनी यात्रेच्या दरम्यान अगदी चोख पद्धतीने निभावल्या तसेच आपला प्रांत बदलला विभाग बदलला की जेवण बदलत असतं आणि याचीच जाणीव त्यांनी पूर्णपणे घेऊन आपल्या यात्रेकरूंना अगदी चविष्ट असे आपल्या महाराष्ट्र पद्धतीचे जेवण तिकडे त्यांनी दिले जेणेकरून या यात्रे दरम्यानचा प्रवास त्यांचा अगदी सुखकर झाला. आणि या सर्व गोष्टी तंतोतंत पूर्ण झाल्या कारण त्यांनी या सर्व गोष्टीचे यात्रेचे नियोजन पूर्वीच केले होते. त्यामुळे या यात्रेच्या सुनियोजन प्रशासन व्यवस्था आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाली. खूप छान नियोजनबद्ध यात्रा पूर्ण झाली त्याबद्दल पुन्हा एकदा पवार महाराज तुमचे मनापासून खुप खुप धन्यवाद आणि पुढील यात्राच्या शुभेच्छा.
————————————————————————-सध्या नुकतीच पुर्ण झालेले यात्राला एवढं महत्व का ?
जाणून घेऊया त्या स्थळ बद्दल ज्या धार्मिक स्थळावर आत्ता सध्या यात्रा मधील भाविक जाऊन आले.
Advertisement१) काशी
हिंदू संस्कृती मध्ये काशी मधील असलेले बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेले विश्वेश्वर महादेव मंदिर आहे. असी आणि वारणा नदी काठी वसलेलले हे एक सुंदर शहर आहे.. शिवाय गंगा नदीच्या काठी वसलेलेली काशी अनेक पाप विनाशक म्हणुन काशी तीर्थ क्षेत्राला लाखो लोक दर वर्षी काशी ला जातात.इतिहास पाहिला गेलात तर ५०० हुन वर्ष अधिकचा इतिहास ह्या काशी शहराला आहे. महाभारत ग्रंथ मध्ये ही काशी चा उल्लेख पुढे आढळतो.जवळपास ८४ घाट असेललेले शहर म्हणुन या शहराला एक वेगळी संस्कृतीक दृष्टीने वेगळी ओळख आहे. ‘कुतुबुउद्दीन ऐबक’ शासकाच्या काळात काशी मधील मंदिर पाडून तिथे मशीद उभा केली होती आणि नंतरच्या काळात तिथे हिंदूंना जाण्यास परवानगी नव्हती पुढे मुघल काळात अकबर बादशाह च्या काळात ‘तोरमंडल’ म्हणुन हिंदू राजा ने हे मंदिर पुन्हा नव्याने बांधून काढले आणि अतिशय निष्ठुर असलेल्या मुगल क्रूर शासक औरंगजेब च्या काळात हे मंदिर पुन्हा पाडण्यात आले.नंतर च्या १६ शतकाच्या उतरार्ध मध्ये अनेक शिवमंदिर ज्यांनी पुन्हा उभ केले ह्या अहिल्यादेवी होळकर यांनी हे मंदिर पुन्हा बांधून घेतले आणि राजा रणजीतसिंग यांनी या मंदिरावर सोन्याचा कळस बसवण्यात आलेला होता नंतर तो यवनाने चोरून नेला पुढे आठराव्या शतकाच्या पूर्वार्ध मध्ये संत एकनाथ महाराज यांनी येथेच ‘एकनाथ भागवत’ ग्रंथ हिथेच लिहला होता. असे अनेक प्रसंग आणि महत्व ह्या काशी बद्दल आपल्याला सांगता येईल. ह्याला काशी, बनारस, वाराणसी ह्या नावाने देखील ओळखले जाते.२) चित्रकुट
विंद्ध पर्वत रांगे मध्ये वसलेले हे शहर सध्या उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या दोन राज्याच्या सीमावर हे शहर आहे. प्रभू श्रीराम यांच्या सानिध्याने पवित्र झालेली ही नगरी आहे. प्रभू श्रीराम यांना चौदा वर्षाचा वनवासातील साधारण १२ वर्षाचा काळ प्रभू श्री राम यांनी चित्रकूट येथे पुर्ण केला होता.याच ठिकाणी प्रभू राम यांनी आपले वडिलांचे अंत्यसंस्कार केले असे उल्लेख आढळतात.अनेक साधू संत यांचे वास्तव्य या नगरी मध्ये आपल्याला पूर्वी पाहिला मिळते. मंदाकिनी नदीच्या काठी चित्रकूट घाटाचे दृष्य छान आहे. हे शहर ऋषी अत्री, ऋषी अगस्त, ऋषी शरभंगा सारखे अनेक ऋषींचा वास्तव्य ह्या नगरीला मिळाले आहे.
———————————————————-
३) प्रयागराजउत्तर प्रदेश मधील असलेले हे ठिकाण हिंदू धर्मा मधील पवित्र स्थळ मधील गणले जाणारे हे शहर आहे येथे अनेक पौराणिक मंदिरे आहेत. गंगा, यमुना, सरस्वती नदीचा संगम असलेली हे शहर प्रत्येक बारा वर्षा तुन एकदा महाकुंभ मेळा साठी प्रसिद्ध आहे. महाकुंभ फक्त येथेच आयोजित केला जातो ज्यात लाखो भाविक जगभरातून सामील होतात.या शहरात अनेक पुरातन मंदिरे आणि घाट आहेत.जगातील एकमेव झोपलेले स्तिती मधील हनुमान मंदिर प्रयागराज येथे आहे.
———————————————————-
४) आयोध्याउत्तर प्रदेश राज्यामध्ये मध्ये प्रभू श्रीराम यांचा जिथे जन्म झाला. शरयू नदी काठी वसलेली ही नगरी हिंदू धर्मामधील तीर्थक्षेत्र पैकी एक पवित्र मानले जाते.मुघल शासक बाबर च्या काळात येथील प्रभू श्रीराम यांचे मंदिर तोंडण्यात आले आणि त्या नंतर पासून आत्ता २२जानेवारी २०२२ मध्ये श्रीराम यांचे मंदिर पुन्हा नव्याने बांधन्यात आले आहे.
———————————————————-
महाराष्ट्रामधील मराठवाडा कुठे आणि चार धाम असलेले ठिकाण कुठे आणि तीन राज्याच्या सीमा ओलांडून ह्या तीर्थक्षेत्र ला भेटी असतील. त्यात हिंदू धर्म मधील पवित्र यात्रा मधील तीर्थक्षेत्र आहेत.आपल्याला या साठी दोन ते तीन राज्याच्या सीमा ओलांडाव्या लागतात ज्या एवढ्या लोकांना घेऊन जाने आणि आणणे एवढे सोप्प नाही. हजारो किलोमीटर अंतराचं अगदी सुनियोजीत प्लॅनिंग करणे एवढी सोपी गोष्ट नव्हती. तीन राज्यांच्या सीमा ओलांडून तिथे नियोजन करणे पूर्वनियोजन असल्याशिवाय शक्य नाही.यात्रेच्या दरम्यानचे सुनियोजित असलेले बाबी त्यांना नक्कीच कामाला आल्या पंचक्रोशीतील त्यांच्या सहकारी वृंद्ध खूप छान पद्धतीने त्यांना सहकार्य केले आपल्याला पाहिला मिळाले. आपल्या गावातील देखील जेष्ठ मंडळी नवयुवक पिढी यांनी या यात्रेमध्ये अगदी उत्साहाने सहभाग घेतला आणि इतिहासाचे साक्षीदार झाले या तीर्थक्षेत्र यात्रा करून गावातील भाविकांना यात्रेत खुप आनंद झाला. आणि या सर्वांना हे आयोजित करणारे यात्राचे व्यवस्थापक सर्वेसर्वा प्रमोद महाराज पवार यांनी अगदी व्यवस्थितपणे यात्रेचा सांगता केली. यात्रे वरून आलेल्या सर्व माणसांचे सर्व गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने स्वागत केले. या आधी कधीच असेल मोठ्या नियोजन मध्ये आपल्या भागात अशी यात्रा मोठ्या स्तरावर काढली जात नाही.कुठलीच अशा यात्रा चे स्वागत गावात झालेले आठवत नाही.असे स्वागत गावकरी यांनी या भाविकांचे केले.
———————————————————- मनोगतहिंदू संस्कृती मध्ये अशा चारधाम आणि असे पुण्य तीर्थक्षेत्र च्या ज्या यात्रा भविष्यामध्ये होतील यामध्ये सर्व पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी नक्कीच सहभागी व्हावे. आणि हिंदू संस्कृतीचे जतन करा आणि आपल्याच मधील असणाऱ्या पवार महाराज यांना सर्वांनी आपल्या आपल्या स्तरावर या पुढील यात्रा मध्ये सहकार्य करावे.सदरील लेख मी माझ्या स्व इच्छाने लिहीत आहे कारण आम्ही जेंव्हा सह्याद्री मधील गडकिल्ले पाहण्याची अभ्यास करण्याची तयारी करतो तेंव्हा नियोजन आणि पूर्व तयारी नसल्यास काय समस्याना तोंड द्यावं लागत याची जाणीव आहे म्हणुन या यात्रा सर्वांनी दिसली मी या यात्राच्या माघील नियोजन समजु शकतो. म्हणुन हा श्री पवार महाराज यांच्या कार्यास हा माझा लेख समर्पित करत आहे.
राम कृष्ण हरी
टीप:-सदरील लेख पवार महाराजांच्या कार्यास समर्पित
•राज दादा तपसे
![]()
![]()
![]()