श्री रानोबा यात्रेनिमित्त टाकळी येथे भव्य बैलगाडा शर्यत मोठ्या उत्साहात संपन्न !
केज : प्रतिनिधी
केज तालुक्यातील टाकळी येथे श्री रानोबा यात्रेनिमित्त भव्य बैलगाड्या शर्यतीचे आयोजन दि. ०५ में २०२५ रोजी करण्यात आले होते. बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष भगवानराव केदार,कृ.उ. बा.स.उपसभापती डॉ. वासुदेवजी नेहरकर, सरपंच अनंतकुमार घुले सर,तसेच सर्व ग्रामस्थांनी शुभ हस्ते करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांची अंतिम फेरीवेळी विशेष उपस्थित राहिली.या बैलगाडा शर्यतीसाठी प्रथम बक्षीस ३१,००० रुपये आ. नमिताताई मुंदडातर द्वितीय बक्षीस २१,००० ररुपये भाजपा युवा नेते सुरज रामकृष्ण घुले तसेच तृतीय बक्षीस १५,००० रुपये चेअरमन रघुनाथ बप्पा बारगजे व उद्योजक विष्णू जीवन राख,चौथे बक्षीस ११,००० रुपये युवा नेते श्रीकांत नारायण घुले,पाचवे बक्षीस ९,००० रुपये युवा नेते सुरेश गजेराम घुले,सहावे बक्षीस ७,००० रुपये बालाजी शिवाजी कांदे व सातवे बक्षीस ५,००० रुपये सुरज बालाजी घुले यांनी दिले.
बैलगाडा शर्यतीसाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात प्रतियोगी सहभागी झाले.तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उपस्थित राहून स्पर्धेची शोभा वाढवली.या स्पर्धेमध्ये एकूण १२७ बैलगाडा शर्यतमध्ये सहभागी झाले.अतिशय चुरशीच्या शर्यतीमध्ये पुढील प्रमाणे बक्षीस वितरण करण्यात आले.प्रथम क्रमांक आई येडेश्वरी प्रसन्न,हातगाव व द्वितीय क्रमांक संतोष गोरे,माजीद पठाण,छ. संभाजीनगर तर तृतीय क्रमांक म्हूणन संत बाळूमामा प्रसन्न देवळगाव घाट,चौथा क्रमांक राहुल चाबुकस्वार खादगाव,पाचवा क्रमांक काळभैरव प्रसन्न, पंढरपूर,सहावा क्रमांक रामगिरी बाबा प्रसन्न, डोका,तर सातवा क्रमांक श्री रानोबा प्रसन्न टाकळी असे बक्षीस देण्यात आले.यावेळी महादेव घुले,विक्रम घुले,संजीवन घुले,बालासाहेब सांगळे,रवी घुले,अमोल घुले, धनराज घुले,श्रीराम घुले,प्रकाश बारगजे तसेच सर्व टाकळी ग्रामस्थांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.