टाकळीमध्ये उद्या श्री रानोबा यात्रेनिमित्त एक आदत एक बैल/ओपन भव्य बैलगाडा शर्यत !
केज : प्रतिनिधी
केज तालुक्यातील टाकळी येथे दि.०५ में २०२५ रोजी सकाळी ठीक ०८: ३० ला श्री रानोबा यात्रेनिमित्त एक आदत एक बैल/ओपन भव्य बैलगाडा शर्यतीचे बीड रोड पासून आतमध्ये ५०० मीटर अंतरावर शिवरस्ता टाकळी येथे आयोजन करण्यात आले आहे.
या बैलगाडा शर्यतीचे पहिले बक्षीस केज विधानसभा मतदार संघच्या आमदार नमिता अक्षय मुंदडा यांच्यावत्तीने ३१००० रुपये तर दुसरे बक्षीस भाजपाचे युवा नेते सुरज रामकृष्ण घुले यांच्यावत्तीने २१००० रुपये व तिसरे बक्षीस विष्णु जीवन राव व रघुनाथ बारगजे यांच्यावत्तीने १५००० रुपये,चौथे बक्षीस श्रीकांत घुले यांनी ११०००रुपये,पाचवे बक्षीस सुरेश घुले यांनी ९००० रुपये,सहावे बक्षीस ७००० रुपये बालाजी कांदे यांच्याकडून तर सातवे बक्षीस ५००० रुपये सुरज बालाजी घुले यांनी ठेवले आहे.या बैलगाडा शर्यतीसाठी प्रवेश फीस फक्त ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. ऑनलाईन नोंदणी साठी संपर्क अतुल घुले-7350417570 आणि प्रवीण सांगळे 8380030765 देण्यात आला आहॆ.
अधिक माहितीसाठी महादेव घुले,सुरज घुले,रवि घुले,अमोल घुले,संजीवन घुले,विक्रम घुले,बाळासाहेब सांगळे,धनराज घुले यांच्याशी संपर्क साधावा व पंचक्रोशितील सर्व बैलगाडा प्रेमिंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन मैदानाची शोभा वाढवावी अशी विनंती व आव्हान श्री रानोबा यात्रा कमिटी व गांवकरी मंडळ,टाकळी यांनी केले आहे.
••नियम व अटी ••
१) शासनाच्या नियम व अटी पाळून मैदान होईल.
२) मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटना नियमानुसार होईल.
३) डबल बैल पळाला ऑब्जेशन आल्यास ती गाडी बाद होईल.
४) प्रवेश फी ९९९ ऑनलाईन नोंद घेतली जाईल.
५) ऑफलाईन नोंद घेतली जाणार नाही.
६) गट सेमी फायनल चीट्या काढून होईल.
७) मैदान प्रेक्षकांनी स्वतःच्या जबाबदारीवर पहावे.
८) पंचांचा निर्णय अंतिम राहील.