प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घराचे स्वप्न साकार होणार !


नागरिकांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घ्यावा सरपंच सौ.उषा दळवी

केज : प्रतिनिधी

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सर्व सामान्याचे नागरिकांचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे.पीएम आवास योजनेत ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावातील सर्वसामान्य नागरिकांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच सौ.उषा जालिंदर दळवी यांनी केले आहे.

Advertisement

या योजनेसाठी चंदनसावरगाव ग्रामपंचायत अंतर्गत सरपंच सौ. दळवी यांनी आव्हान केले की, प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा- २ अंतर्गत पात्र कुटुंबाचे आवास प्लस २०२४ मोबाईल App Ûmao Self Survey सुरू झालेला आहे. मोबाईल -द्वारे स्वतः पात्र कुटुंब प्रमुख किंवा कुटुंबातील कोणताही सदस्य मोबाईल App Umao आपल्या कुटुंबाचा सर्वे करुण ऑनलाईन माहिती आपलोड करू शकतो.मात्र यामध्ये संबंधीत कुंटुंब प्रमुखाने अथवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यांच्या नावे यापुर्वी कोणत्याही योजनेतुन घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा किंवा संबंधीत कुंटुंब प्रमुखाचे नाव सन २०१८ च्या सर्वेनुसार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-१ मध्ये नाव समाविष्ट नसावे.सदरील मोबाईल App Ûmao आपल्या कुटुंबाचा घरकुलासाठीचा सर्वे आपण स्वतः दि.१५ में २०२५ पुर्वी करण्यात यावा.या तारखे नंतर सदरील मोबाईल App बंद होणार असुन ज्यांनी स्वतः मोबाईल-द्वारे सर्वे करुण माहिती ऑनलाईन अपलोड केलेली आहे.हजारो कुटुंबांचे हक्काचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनाचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत समाविष्ट होण्यासाठी सद्या सर्व्हे सुरु आहेत.यामध्ये आपली नोंदणी करण्यासाठी सरपंच, ग्रामविकास अधिकारी किंवा आपण स्वतः सेल्फ सर्व्हे करून आपली नोंदणी करू शकता. एक ते दहा निकषांचे पालन करून कच्चे घर असणाऱ्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेत आपली नोंदणी करावी. नोंदणी करण्यासाठी १५ में ही शेवटची तारीख असून त्या नागरिकांनी आपली नोंदणी करून घ्यावी असे आव्हान सरपंच सौ.उषा जालिंदर दळवी यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!