राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते शंकर तपसे यांच्या ज्येष्ठ कन्येचा विवाह थाटात संपन्न
केज : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार पक्षाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष शंकर तपसे यांची ज्येष्ठ कन्या साक्षी व चंद्रसेन मेटे यांचे चिरंजीव स्वप्नील याचा विवाह काल मोठ्या थाटात अन् मोठ्या उत्साहात साजरा झाला.
यावेळी बीड जिल्ह्याचे खा.बजरंग बाप्पा सोनवणे, शिवसंग्राम पक्षाच्या नेत्या ज्योतीताई मेटे, ह.भ.प. नारायण महाराज उत्तरेश्वर पिंपरीकर, तात्कालीन बीड जिल्हा शल्यचिकित डॉ.अशोक थोरात,मा.आ.संजय दौंड,मा.आ.पृथ्वीराज साठे,मा.आ.संगीताताई ठोंबरे, नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अंकुशरावजी इंगळे,युवा नेते ऋषिकेश आडसकर,डॉ.योगिनीताई थोरात,राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, जनविकास आघाडीचे प्रमुख हारून भाई इनामदार,डॉ. वासुदेव नेहरकर,जय शिवसग्राम पक्षाचे अध्यक्ष रामहरी मेटे,भाजप केज तालुका अध्यक्ष भगवान केदार,प्रीतम खरात,डॉ.उत्तम खोडसे हे वधुवरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी उपस्थित होते.
त्याचबरोबर जिल्ह्यासह मराठवाड्यातील आणि राजकीय,सामाजिक,व्यावसायिक सह अन्य क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून साक्षी व स्वप्नीलला शुभाशिर्वाद दिले.सदरचा हा विवाह केज- अंबाजोगाई रोडवरील चंदनसावरगाव येथील निसर्ग हॉटेल समोर संपन्न झाला.यावेळी वधुवरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी अध्यात्मिक क्षेत्रातील, महानुभवासह राजकीय क्षेत्रातले लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शंकर बापू तपसे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत आले आहेत.त्यांच्या ज्येष्ठ कन्येच्या विवाहासाठी खासदार,आमदार,जिल्हा परिषद सदस्य,पं.स.सदस्य यांच्यासह सरपंच,उपसरपंच,व्यापारी,वकील,पत्रकार, अधिकारी,कर्मचारी,सर्वसामान्यांनी उपस्थिती दर्शवून वधुवरांना शुभाशिर्वाद दिले.यावेळी शंकर बापू तपसे व त्यांच्या अप्तस्वकियांसह मित्र परिवाराने येणार्या पाहुण्यांचे स्वागत केले.विवाह सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.