लॉंड्री चालक शंकर राऊत यांचा प्रमाणिकपणा ; पंधरा हजाराचे पॉकेट केले परत
केज : प्रतिनिधी
केज शहरात बस स्थानकालगत छोटीशी लॉन्ड्री चालवणारे शंकर राऊत यांनी एका ग्राहकाचे विसरून राहिलेले पॉकेट त्यांनी प्रामाणिकपणे परत केले. ग्राहक महेंद्र साटे यांचे पॉकेट होते. पॉकेट मध्ये असलेली पंधरा हजार रुपये रक्कमेसह पॉकेट परत केले.
Advertisement
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये काम करणारे राऊत यांनी प्रामाणिकपणा दिसून आला. आजही प्रामाणिकपणा आहे त्याची पावती मिळाली. फोन करून त्यांना बोलावून घेऊन पॉकेट परत केले. एकीकडे सर्वत्र खोटारडेपणा सुरू असतानाही अशी प्रमाणिक माणसे आहेत याचा प्रत्यय आला. माझे कष्टाचेच मला पुरे तुमचा एकही रुपया मला नको असं काम करणारी माणसं ही समाजात आहेत.