छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ठाकरे सेनेचे विविध कार्यक्रम


लातूर : अशोक गरड

Advertisement

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक लातूर येथे पक्षाच्या वतीने अभिषेक व पुजन जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी व सहसपंर्कप्रमुख नामदेव चाळक यांच्या हस्ते संपन्न झाले यानंतर मोफत खिचडी वाटप करण्यात आली. जयंती निमित्त पक्षाच्या वतीने छावा चित्रपट मोफत दाखवण्यात आला. या चित्रपटाचा शुभारंभ जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, सहसंपर्कप्रमुख नामदेव चाळक, महिला जिल्हा संघटक सौ जयश्रीताई उटगे, सुनीता चाळक, उपजिल्हाप्रमुख बालाजी जाधव, महानगर प्रमुख सुनील बसपुरे, विष्णू साठे, रमेश माळी, राहूल रोडे, अविनाश रेशमे, शंकर रांजणकर, आबासाहेब पवार, शिवाजी चव्हाण, मुकेश सुडे, संजय उजळबे, किशोर जाधव, शेखर चव्हाण, बसवराज मंगरूळे, अण्णासाहेब मिरगाळे सुनिता भोसले आदी सह शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!