फेसबुक पोस्ट करून गळफास घेऊन जीवन संपवले
बीड : प्रतिनिधी
बीड शहरातील बार्शी रोडवरील स्वराज्य नगर भागातील एका अर्बन बॅकेच्या दारातच एसीच्या ग्रीलला एकाने फेसबुक पोस्ट करून गळफास घेतला.
मयत हा केज तालुक्यातील केळगाव येथील धनंजय अभिमान नागरगोजे राहणार.देवगाव ता.केज हा कायम विनाअनुदानित आश्रम शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होता. 2019 मध्ये राज्य सरकारने 20 टक्के अनुदान घोषित करण्यात आले होते. मात्र त्याची अंमलबजावणी झालीच नाही. गेल्या अनेक वर्षापासून शिक्षक म्हणून काम करत असून देखील वेतन मिळत नसल्याने त्यांना अनेक अडचणीना सामना करावा लागत होता.अशी चर्चा होती.त्यामुळे त्याने आज रोजी दिनाक १५ मार्च शनिवार शिक्षकाने बीड येथील स्वराज्य नगर भागातील एका बँकेच्या दारात एसीच्या ग्रीलला गळफास घेऊन आत्महत्या केली. असे बोलले जात आहे.बँकेच्या दारातच एकाने गळफास घेतल्याचे निदर्शनास आल्याने याची माहिती स्थानिक नागरिकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याला दिली असता, शिवाजीनगर पोलिसांनी त्याला बीड शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले. आत्महत्येचे खरे कारण मात्र समजू शकले नाही, काही वेळातच सविस्तवृत्त देण्यात येईल..