राजर्षी शाहू ता ग्रामीण नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणुक बिनविरोध


केज : प्रतिनिधी

केज येथील राजर्षी शाहू ता ग्रामीण नागरी सहकारी पतसंस्था म.केज या पत संस्थेची सन 2025 – 2030 या पंचवार्षिक कालावधी करीता ‌चेअरमन,व्हा.चेअरमन,व संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली. संस्थेचा कारभार योग्य रीतीने सुरु असल्यामुळे अनावश्यक खर्च टाळुन निवडणूक बिनविरोध करण्यात आली या बिनविरोध निवडणुकीसाठी संस्थेचे व्यवस्थापक प्रवीण भिसे लिपिक राजेश साखरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या संस्थेच्या ‌चेअरमन पदी रमेश शिंदे,तर व्हा. चेअरमन पदी लालासाहेब वायबसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली या निवडी बद्दल.येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन तथा खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन केले आहे.

Advertisement

यावेळी श्री.गायकवाड वचिष्ठ रामरतन,श्री.जाधव विजयसिंह रावसाहेब,श्री.थोरात राजपाल प्रकाश,श्री.जाधव श्रीहरी चंद्रसेन, सय्यद शरीफ सय्यद पाशा,श्री.पोटभरे माणिक रावण,श्री.संभाजी लोमटे,श्री.तारळकर अशोक सदाशिव,श्री.नाळवंडीकर प्रकाश श्री.करपे संदीप अंकुशराव,श्री.गणेश शिंदे साहाय्यक निबंधक कार्यालयाचे जगदाळे साहेब,मुंडे साहेब,पवार साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी अजित आरेकर व संस्थेचे सभासद उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!