धरण उशाला कोरड घशाला ; सोनीजवळा ग्रामस्थांचा पाण्यासाठी टाहो !
पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन करू-मीनाज पठाण
केज : प्रतिनिधी
यावर्षी केज तालुक्यात चांगल्या प्रमाणात पाऊस झाला असून तालुक्यातील जवळपास लहान-मोठे सर्व साठवण तलाव धरण पूर्ण क्षमतेने भरले होते.परंतु पाणी असतानाही अनेक गावे पाण्यापासून वंचित आहेत.त्यामुळे या गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
Advertisement
केज तालुक्यातील सोनीजवळा या गावातील जनतेला गेल्या दहा दिवसापासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने गावातील जनतेला पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत सदरील पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य मिनाज पठाण यांनी केला आहे.