होळ-आडस रस्त्यालगतच्या शेतात ३ महिन्यांचे अर्भक सापडले!


पोलिसांनी सदर अर्भक ग्रामीण रुग्णालयात केले दाखल

केज : प्रतिनिधी 

केज तालुक्यातील होळ ते आडस दरम्यान जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एका उसाच्या शेतात तीन महिन्याचे पुरुष जातीचे जिवंत अर्भक आढळून आले आहे.

Advertisement

या बाबतची माहिती अशी की, आज (सोमवार) दिनांक २३ डिसेंबर रोजी सकाळी ७:०० वाजण्याच्या सुमारास शेतात जाणाऱ्या एका शेतकऱ्याला उसाच्या पाचटात काळ्या व लाल चौकटी रंगाच्या रग पांघरून घातलेले एक तीन महिन्याचे पुरुष जातीचे जिवंत अर्भक आढळून आले. शेतकऱ्याने ही माहिती युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांना दिली.ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांनी पोलीस उपनिरीक्षक राहुल पतंगे आणि पोलीस खेडकर व महिला पोलिस गाडेकर यांना घटनास्थळी रवाना केले. घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनी सदर अर्भक ताब्यात घेवून त्याला स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी दाखल केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!