औसा शहरात अवैध धंद्याचा खुलेआम बाजार !


शहरात वाढले अवैध व्यवसाय,अवैध धंद्यांमुळे अनेकांचे कुटुंब होतेय उद्ध्वस्त !

औसा : प्रवीण कोव्हाळे

गेल्या काही वर्षात तरुणाईमध्ये वाढत असलेल्या कमी गुंतवनुक करुन जास्त नफा कमावण्याच्या मानसिकतेमुळे अवैध धंद्याकडे अनेक तरूणांचा कल वाढला आहे. त्याचाच फायदा घेत औसा शहरात अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे़. अशा धंद्याकडे तरूणां वाढलेला कल आणि पोलिस विभागाकडून त्याकडे करण्यात येणारे दुर्लक्ष यामुळे अवैध धंद्यांना जणु मोकळे रानच मिळाले आहे. औसा शहरातील विविध भागात सुरू असलेल्या या अवैध धंद्यांमुळे आता शहरातील अवैध धंद्यांना पोलिसांनी ‘एनओसी’च दिली की काय,असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित केल्या जात आहे.

बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर शहरासह ग्रामीण भागातील तरूण कमी गुंतवणुकीचा व्यवसाय म्हणुन पाणठेला,चहाची टपरी अशा व्यवसायाकडे वळत होते. मात्र, आता कमी गुंतवणुकीत जादा नफा कमावण्याच्या नादात दारूविक्री, सट्टा पट्टी, जुगार, मटका अशा अवैध धंद्याकडे त्यांचा कल वळल्याचे दिसून येत आहे. पान ठेला किंवा चहा टपरीच्या माध्यमातून दहा वर्षांत जेवढा पैसा कमावता येणार नाही, तेवढा पैसा अवैध धंद्यात केवळ दोन ते तीन वर्षांत कमावता येतो असा त्यांचा समज आहे. त्यामुळे अधिक पैसा कमावण्याच्या लालसेनेच जिल्हाभर दारूचा व्यवसाय गृह उद्योग तर सट्टा पट्टी उदरनिर्वाहाचे साधन झाले आहे. तरूणांनी सट्टा पट्टीला स्वत:च्या उदरनिर्वाहाचे साधन बनविले आहे. घरून पाहिजे तेवढा पॉकेटमनी मिळू शकत नाही, घरून मिळालेल्या पॉकेटमनी मध्ये तरूणांच्या गरजा भागू शकत नाहीत़, यावर तरुणांनी उपाय शोधला असून, सट्टा पट्टीवर पैसा लावून जादा पैसा कमावण्यात तरूण लागले आहेत. सट्टा पट्टीवर तरूणांना सव्वा रूपयात शंभर रूपये मिळविता येत आहेत. क्रमांकाच्या अंदाजावर आकडेमोड करून सट्ट्याचे गणित मांडल्या जात आहे. तरुणांसोबत शासकीय सेवेतील कर्मचारी देखील सट्ट्याच्या आहारी गेले आहेत. मात्र या नादात पैसा मिळवण्यापेक्षा गमावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यातुनच कर्जबाजारीपणा आणि नशेच्या आहारी जाणारे तरुण अनपेक्षितपणे गुन्हेगारी कडेही वळत आहे.

Advertisement

या सट्टा पट्टीच्या नादी लागुण कित्येक तरुण दिवसभर आकडे मोडीच्या गणिताचा अभ्यास करीत असतात. शहरात कित्येक सट्टा पट्टी दलालांनी पट्टी घेण्याचे कार्यालय लावलेले आहे. या अवैध धंद्यांनी कित्येक कुटुंब उद्ध्वस्त केले आहेत. तरीही या धंद्याच्या नादी लागणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. या व्यवसायाबद्दल आरडाओरड झाल्यास काही दिवसांसाठी हे व्यवसाय छुप्या पद्धतीने चालविण्यात येतात. त्यानंतर मात्र, परिस्थिती जैसे थे असते.औसा शहर या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत खुलेआम सट्टापट्टीसह इतर अवैध व्यवसाय सुरू आहे. मात्र असे असतानाही या पोलिस ठाण्याकडून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे दिसून येते.त्यामुळे आता जिल्हा पोलिस अधीक्षक यांनीच या गंभीर बाबीकडे लक्ष पुरवावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

————-
लॉजवर ९०% टक्के अल्पवयीन मुलीचे देह विक्रीस परवानगी कोणाची ?

भाग – २ लवकरच


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!