आपण मंजूर केलेल्या 206 कोटी रूपयांच्या योजनेतून अंबाजोगाईचा पाणी प्रश्न कायम स्वरूपी सुटणार-नमिता मुंदडा


शहरातील लालनगर भागात शेकडो महिला, युवती आणि नागरिकांनी दिला नमिताताईंना आशिर्वाद

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

नातं विकासाचं काम विश्वासाचं हे ब्रिद घेवून माजी आ. नमिताताई मुंदडा यांनी मागील पाच वर्षात केलेलं विकास काम यामुळे त्यांचा जनमाणसामध्ये विकासप्रिय आमदार असा ठसा उमटला आहे. सध्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंदडा यांना जनतेचा दिवसेंदिवस पाठींबा वाढत आहे. विविध समाज घटक नमिताताईंच्या विजयासाठी सरसावले आहेत. मंगळवारी सायंकाळी शहरातील लाल नगर भागात शेकडो महिला, युवती आणि नागरिकांनी नमिताताई मुंदडा यांना सक्रिय पाठींबा दर्शवत विजयासाठी आशिर्वाद दिले.

अंबाजोगाई शहरातील लालनगर येथे महिला-भगिनी यांनी आयोजित केलेल्या संवाद बैठकीस माजी आ. नमिता मुंदडा या उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित सर्वांशी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. तसेच होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत माझ्या पाठीशी राहत मला मतदानरुपी आशीर्वाद द्यावेत, अशी नम्र विनंती केली. या प्रसंगी मतदार बंधू-भगिनी, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. नातं विकासाचं काम विश्वासाचं हे ब्रिद घेवून आपण मागील पाच वर्षे काम केलं आहे. त्याची पावती जनता आशिर्वाद रूपाने देणार आहे.

Advertisement

आपण धनेगाव धरणातून अंबाजोगाई शहराला
होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचे अधिक विस्तार करण्यासाठी 206 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली असून या योजनेचे प्रत्यक्ष काम प्रगतीपथावर आहे. ही योजना प्रत्यक्ष कार्यरत झाल्यानंतर, अंबाजोगाई शहरातील नागरिकांची पाणीटंचाई पासून कायमची सुटका होणार आहे. अंबाजोगाई शहराच्या पाणीपुरवठा योजना विस्तारीकरणाची माहिती देणारी संक्षिप्त चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली. यावेळी लाल नगर भागातील सामाजिक कार्यकर्ते आकाश वेडे, माजी नगरसेवक संतोष शिनगारे, शरीफ शेख, चंद्रकांत बनसोडे, अमर ससाने, रामदास घाडगे, प्रशांत घाडगे, शंकर एडके, युसुफ शेख, सुनिल थोरात, जफर शेख, अफसर शेख, संगीता पौळे, कलाबाई पौळे, परवीन सय्यद, वंदना घाडगे, ललिता कांबळे, वंदना कांबळे, कालिंदाबाई सरवदे, जमुनाबाई वाघमारे, सुनिला वेडे, शालुबाई मस्के आदींसह ज्येष्ठ नागरिक, महिला, युवती, युवक यांच्यासह भाजपा, महायुती घटक पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!