मनसेचे रमेश तात्या गालफाडे यांची प्रचारात आघाडी !


चेहरा नवा बदल हवा ; केज मतदारसंघात मतदाराचा उस्फुर्त प्रतिसाद

केज  : प्रतिनिधी

केज विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार रमेश तात्या गालफाडे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याने एकंदरीत चित्र दिसत आहे.

रमेश तात्या गालफडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी केज शहरासह मतदारसंघातील खेड्यापाड्यात जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेऊन मतदानाचे आव्हान करीत आहेत.तसेच आजपर्यंत केलेल्या कामासह पुढील काळात केज मतदार संघात विकासाचे व्हिजन काय असेल याबाबत मतदारांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या या गावभेटीत दौऱ्याला गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून तालुक्यातील मुंदडा- साठे या प्रस्थापितांच्या भुलभुलैय्या कंटाळलेले मतदार आता चेहरा नवा,बदल हवा अशाप्रकारे बोलू लागल्याने विरोधकांचे धाबे चांगलेच दणाणले असल्याचे चित्र दिसत आहे.

केज मतदारसंघात मुंदडा -साठे या प्रस्थापितांची सत्ता आतापर्यंत राहिलेली आहे.मात्र तालुक्यातील जनसामान्यांचे प्रश्न या प्रस्थापित मुंदडा – साठेना सोडवता न आल्याने मतदार संघातील जनतेत एक प्रकारे नाराजीचा सुर आहे. त्यातच यावेळी मुंदडा- साठे याना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार रमेश तात्या गालफाडे यांनी आव्हान उभे केल्याने निवडणुकीची रंगत वाढली असून याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. रमेश तात्या गालफाडे मागील काही वर्षात केज मतदार संघात राबविलेले विविध सामाजिक उपक्रम तसेच लोकांच्या अडीअडचणी दरम्यान मदतीसाठी धावून जाणारे नेतृत्व म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रमेश तात्या गालफाडे यांना उमेदवारी दिली.त्यामुळे येथील मुंदडा – साठे या प्रस्थापितांना रमेश तात्या गालफाडे यांच्या उमेदवारीमुळे तडगे आव्हान उभे राहिले आहे.

Advertisement

रमेश तात्या गालफाडे यांनी देखील यावेळी
प्रस्थापितांना कोणत्याही परिस्थितीत मात द्यायची हा चंग मनाशी बांधून अगोदरच मतदारसंघातील गावोगावी दोन-तीन वेळा पोहचून तगडी यंत्रणा उभी केली आहे. त्यांचा प्रचार अगदी तळागाळात पोहचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी देखील कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. रमेश तात्या गालफाडे यांच्यासह सर्व कार्यकर्ते मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विचार व मतदारसंघातील पक्षाचा विकासनामा त्याचबरोबर निवडणूक चिन्ह रेल्वे इंजिन हे घराघरात पोहचवत आहेत.मतदारसंघातील गावागावांत जाऊन वैयक्तिक गाठीभेटी घेत आहेत.त्यामुळे केज मतदारसंघात रमेश तात्या गालफाडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या मतदार व कार्यकत्यांमध्ये वेगळी ऊर्जा निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.आपला नेता गतीने काम करत असल्याचे पाहून गावोगावी कार्यकर्ते देखील जोमाने प्रचार करत आहेत. या गाठीभेटी दौऱ्यामध्ये ठिकठिकाणी स्वतः उमेदवार रमेश तात्या गालफाडे सहभागी होताना दिसत आहेत.प्रामुख्याने गावागावांतील कार्यकर्ते तसेच मतदारांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता केज मतदार संघातील राजकीय वातावरण मनसेचे उमेदवार रमेश तात्या गालफाडे यांना अत्यंत पोषक बनल्याचे बोलले जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!