आपकी बार केज मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून संगीता ठोंबरे उमेदवार ?


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार केजच्या उमेदवारासाठी विशेष लक्ष देणार !

केज : प्रतिनिधी

विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने शरद पवारांनी स्वतः शनिवार दि.०५ ऑक्टोंबर २०२४ रोजी पुण्यात केज मतदार संघातील अनेक ईच्छूकांच्या मुलाखती घेतल्या आहेत.
मात्र बीड जिल्ह्यावर पुन्हा एखदा शरद पवारांना वर्चस्व निर्माण करायचे आहे,त्यामुळे ऐनवेळी सहाही मतदार संघातून पवार महायुतीला चारीमुंड्या चित करण्यासाठी तगडाच उमेदवार देणार आहेत.केज विधानसभा मतदारसंघातून अनेक इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत,मुलाखत झाल्यानंतर केज मतदार संघात मा.आ.संगीता ठोंबरे यांच्या नावाची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.आता विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असून शरद पवार स्वतः उमेदवार देणार आहेत.

Advertisement

बीड जिल्ह्यातील सहाही मतदार संघाची उमेदवार निवडण्याची जिम्मेदारी खा.सोनवणे यांच्याकडे असेल अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे केज मतदारसंघात खा.बजरंग सोनवणे यावेळी केज मतदार संघातून चांगला उमेदवार देतील अशी चर्चा मतदारसंघात होत आहे.केज मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी मा.आ.संगीता ठोंबरे यांना मिळेल असा विश्वास संगीता ठोंबरे यांना आहे. तसेच ठोंबरे यांना मतदारसंघात मतदारांचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.यामुळे सध्या केज मतदारसंघात संगीता ठोंबरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील सहाही मतदार संघातून शरद पवार गटाकडून नेमकी कोणाला उमेदवारी मिळते याकडे आता संपूर्ण जिल्हावासियांच्या नजरा असणार आहेत. विशेष म्हणजे डॉ.अंजली घाडगे यांनी लोकसभा निवडणुक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.व एकनिष्ठ राहिलेलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मा.आ.पृथ्वीराज साठे यांना जर पक्षाने उमेदवारी न दिल्यास ते अपक्ष निवडणूक लढवणार का ? अशी ही चर्चा होत आहे.मात्र काही दिवसात संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.नेमकी शरद पवारकडून नेमकी उमेदवारी कोणाला मिळेल हे लवकर जाहिर होईल. मुलाखतीच्या वेळी माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे,खा.बजरंग सोनवणे,जयंत पाटील, फौजीया खान,नरेंद्र काळे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!