झेडपीच्या `या` शाळांना गळती,जीव मुठीत घेऊन विद्यार्थी शिकतायत
युसुफ वडगाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील प्रकार
शाळेत विद्यार्थ्यांना गळक्या खोल्यांमध्ये शिक्षणाचे धडे गिरवावे लागतात
केज : प्रतिनिधी
प्रगतीपथावर महाराष्ट्र माझा असं म्हणत ज्या राज्याच्या प्रगतीशील वाटेविषयी लोकप्रतिनीधी चर्चा करत आहेत.पण,याच महाराष्ट्राचं भविष्य असणारी पुढची पिढी सध्या ज्या अवस्थेत शिक्षणाचे धडे गिरवतेय ते पाहता राहून राहून ‘कसा प्रगती करेल महाराष्ट्र माझा ?’ हाच उद्विग्न प्रश्न उपस्थित राहत आहे.
केज तालुक्यातील प्राथमिक शाळांची प्रचंड दूरवस्था झालीये.युसूफ वडगाव मधील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेला तडे गेल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घेण्याची वेळ आलीय.तसंच अनेक वर्ष पत्रे न बदलल्याने यातून पावसाचं पाणी शाळेमध्ये गळतंय.सर्व वर्गात पाणी गळत असल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.एकीकडे सरकारच्या वतीने विकासाच्या गप्पा मारल्या जातात,पण दुसरीकडे मात्र हे भीषण वास्तव सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारं आहे.या शाळेतील अनेक वर्ग खोल्या धोकादायक आहेत.
या गळक्या वर्गखोल्यांमुळे वर्गात पाणी साचल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येतो.या शाळेच्या वर्ग खोल्यांवरील पत्रे तुटलेले असल्याने पावसात या वर्गखोल्यांमध्ये पाणी गळत असल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. या वर्ग खोल्यांच्या खिडक्या तुटलेल्या असल्याने पावसाचे पाणी खिडक्यांमधूनही वर्गात येते.त्यासोबतच वर्गखोल्यातील नादुरुस्ती असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला मोठा धोका आहे.शाळेच्या परिसरात सर्वत्र अस्वच्छता असून शाळेच्या आजूबाजूला घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे.अशा दुर्गंधीत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत.या कडे शिक्षण विभाग लक्ष देणार का ? नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे.
●●●पहा सगळे फोटो सविस्तर….