जलजीवन मिशन योजना सुरू करण्यासाठी गावकऱ्यांच्या वतीने उपोषण


खोट्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून काम लवकर सुरू करा

माजलगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील छोटेवाडी,रामनगर गावामध्ये भारत निर्माण योजनेअंतर्गत एक विहीर व दोन पाण्याच्या टाक्या मंजूर करण्यात आले होत्या. परंतु तात्कालीन सरपंच यांनी या योजनेद्वारे एकही दिवस गावाला पाणीपुरवठा केलेला नाही. तसेच सदर टाक्या पैकी एक टाकी छोटेवाडी शिवारातील गट नंबर २ मध्ये आहे दिसून येत आहे व दुसरी टाकी मोठेवाडी शिवारातील गट नंबर १७७ मध्ये आहे. सदर गटाचे अवलोकन केले असता सरपंच यांनी ७/१२ पत्रकावर ग्रामपंचायत अथवा शासनाच्या मालकी हक्कात नाव नोंदवलेले दिसून येत नाही या योजनेद्वारे टाक्याचे काम चालू असताना ग्रामपंचायत अथवा शासनाच्या मालकी हक्कात तात्कालीन सरपंच यांनी लावणे आवश्यक होते.

सदर जागेमध्ये मालकी हक्कात नाव का लावण्यात आलेले नाही ? याबाबत तात्कालीन सरपंच यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. मोठेवाडी शिवारातील गट नंबर १४० मध्ये विहीर खोदण्यात आलेल्या असून सदर गटांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयाचे मालकी हक्कात नोंद दिसून येत आहे.त्या ठिकाणी दिनांक २३ /३/२०१५ रोजी विद्युत कनेक्शन घेण्यात आलेली आहे. त्याचे बिल सरपंच, ग्रामपंचायत कार्यालय छोटेवाडी या नावाने येत आहे. या योजनेद्वारे ग्रामस्थांना एकही दिवस पाणीपुरवठा करण्यात आलेला नाही. तरीदेखील विद्युत मंडळाकडून नियमित बिल येत आहे.

Advertisement

गावकऱ्यांना या योजनेद्वारे पाणीपुरवठा झालेला नाही तर विद्युत कनेक्शन कोण वापरत आहे याबाबत चौकशी करण्यात यावी. केंद्र शासनाची जलजीवन मिशन योजनेअंतर्गत गोदावरी नदीपासून पाण्याची पाईपालाईन, फिल्टर टॅंक, फिल्टर मंजूर करण्यात आलेले आहे यापैकी पाईपलाईनचे काम, फिल्टरचे बेसमेंट काम, व फिल्टर पासून छोटे वाडी व रामनगर येथील पाण्याच्या टाकी पुढे जाऊन पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे. या योजनेचे काम पूर्ण करण्याची मुदत संपून देखील  या योजनेचे काम झालेले नाही याबाबत संबंधित गुत्तेदारास विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, तुमच्या गावातील काही ग्रामस्थ मला वैयक्तिक त्रास देत असून शासकीय कार्यालयात खोट्या व चुकीच्या तक्रारी देत असल्याने काम शासकीय स्तरावरून तीन ते चार महिन्यापासून थांबविण्यात आलेले आहे. सदर काम पूर्ण न झाल्याने येथील ग्रामस्थांना बोअर, हापसा, विहिरीचे दूषित व अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये रोगराईचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असुन यामुळे गावकऱ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.तरी मा. साहेबांनी पाणीपुरवठा बाबतच्या खोट्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून काम सुरू करण्यात यावे. वरील मागण्यासाठी आज दि. ४ ऑगस्ट रोजी छोटेवाडी येथील ग्रामस्थ पंचायत समिती कार्यालय माजलगाव या ठिकाण वैजनाथ आश्रुबा कटके, संदीप अंगदराव सोळंके, दत्ता तुकाराम इंगळे, बाळासाहेब गणपतराव कटके, सचिन रामकिसन कटके, शिवाजी पांडुरंग कटके, गणेश दगडू सोळंके, संभाजी बाबुराव पोळ, ब्रह्मदेव मारुती ब्रह्मदेव गायकवाड यांच्यासह इतर ग्रामस्थ व गावकरी उपोषण करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!