घाडगे यांच्या वतीने गौरी-गणपतीचे देखावे,सजावट व आरास स्पर्धा
केज : प्रतिनिधी
केज विधानसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या नेत्या डॉ. अंजलीताई घाडगे यांनी केज शहरातील महिलांसाठी एक आगळी वेगळी स्पर्धा आयोजित केलेली आहे.येणाऱ्या गौरी गणपतीच्या सणानिमित्त महिलांनी घरोघरी केलेल्या सजावटीची आणि देखाव्यांची केलेली आरास याची दखल घेत त्यांनी उत्कृष्ट आणि सामाजिक आशय व संदेश देणारे सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या सजावटीसाठी त्यांनी स्पर्धा आयोजित केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्ह्याचे खा.बजरंग बप्पा सोनवणे यांच्या अर्धांगिनी आणि बीड जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ.सारिकाताई बजरंग सोनवणे यांच्या हस्ते उत्कृष्ट देखावा आणि आरास व सजावट करणाऱ्या भगिनींना बक्षीस देऊन गौरव करण्यात येणार आहे.या स्पर्धेमध्ये शहरातील सर्व महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन संयोजक म्हणून डॉ.अंजलीताई घाडगे यांनी केले आहे.