बीड जिल्ह्यात जोरदार पाऊस ; नागरिकांनी सतर्कता बाळगावी


खा.बजरंग सोनवणे यांचे जनतेला आवाहन

बीड : प्रतिनिधी

बीड शहरातील बिंदुसरा नदीच्या काठावरील पूर रेषेच्या आत आणि आसपास राहणाऱ्या रहिवाशांनी विशेष सावधानता बाळगावी. पावसाच्या तीव्रतेमुळे नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढू शकते, ज्यामुळे पूराचा धोका संभवतो. आपली आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, आवश्यक असल्यास त्वरित सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. प्रशासनाच्या सूचना सतत ऐकत राहा आणि परिस्थितीचा आढावा घेत राहा. असे आवाहन खा. बजरंग सोनवणे यांनी केले आहे.

Advertisement

बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे.त्यामुळे नदी,नाले, ओढे, गोदावरी पात्र, लघु,मध्यम प्रकल्प भागात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, बीड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी असल्याने, जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे प्रशासनाशी संपर्क ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून कोणत्याही आपत्कालीन स्थितीत त्वरित मदत मिळू शकेल. तसेच परळी-बीड हायवेवरील पांगरी (वाण नदी) येथील पर्यायी पूल पावसामुळे पाण्याखाली गेला आहे. परिस्थिती गंभीर असून, पूल कधीही वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, परळीवरून बीड आणि बीडवरून परळीला जाणाऱ्या वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. आपल्या सहकार्याने दुर्घटना टाळता येऊ शकते.शेतकरी बांधवांनी आपल्या पशुधनाची विशेष काळजी घ्यावी, कारण हवामानाची अस्थिरता पशुधनासाठी हानिकारक ठरू शकते. तसेच, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानामुळे खरीप पिकांची हानी झाली असल्यास, संबंधित शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या पिकांच्या नुकसानीची माहिती विमा कंपनीला कळवावी. योग्य वेळी सूचना दिल्यास नुकसान भरपाई मिळण्यास मदत होईल.आपल्या हक्कांच्या संरक्षणासाठी हे पाऊल महत्त्वाचे आहे.असे आवाहन खा.बजरंग सोनवणे यांनी केलं आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!