माजी आ.संगीताताई ठोंबरे यांच्या गाडीवर दगडफेक !
गाडीचा चालक व माजी आमदार जखमी
केज : प्रतिनिधी
केज विधानसभेच्या माजी आमदार प्रा. संगीताताई ठोंबरे या केज तालुक्यातील दहिफळ वड माऊली येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त दहिफळ वडगाव येथ गेले असता अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून सायंकाळी ६:०० वाजता त्या ऋषी गदळे घरी चहापाण्यासाठी जात असताना विजय उत्तमराव गदळे यांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. यात गाडीचा ड्रायव्हरच्या बाजूचा काच फुटून तो दगड गाडीचा चालक किशोर बबन मोरे याला लागला.
Advertisement
त्या नंतर तोच दगड गाडीमध्ये बसलेल्या माजी आमदार संगीता ताई ठोंबरे यांना लागून त्याही जखमी झाले आहेत.त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपचार चालू आहे.दरम्यान याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.