केज शहरात घरात घुसले पावसाचे पाणी ; वार्ड क्र.१६ मध्ये तलावाचे स्वरूप !
केज : प्रतिनिधी
मुसळधार पावसामुळे केज शहरातील वार्ड क्रमांक १६ या परिसरातील घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान होते आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूच्या नाल्या बरोबर न झाल्यामुळे गुडघाभर पाणी साचल्याने तलावाचे स्वरुप प्राप्त झाले.
दि.१९ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री सात पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे केज शहरातील काही भागांमध्ये पाणी शिरल्याने मोठी तारांबळ उडालीयं. केज शहरामध्ये सातच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरूवात झाली. शहरात नवीन रोड व नाल्या बनवल्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने पावसाचे पाणी लोकांच्या घरात जात आहे.
घरात शिरलेले पाण्यामुळे लोकप्रतिनिधी व प्रशासानाविरोधात नागरिक संताप व्यक्त करत आहेत. तसेच ही परिस्थिती प्रत्येक पावसात येत असल्याने यापुढे आमच्या घरात किंवा दुकानात पाणी शिरणार नाही अशी व्यवस्था लोकप्रतिनिधीनी व प्रशासनाने करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.