केज तालुक्यात लाडकी बहीण योजनेचे 27 हजार 882 अर्ज मंजूर


अशासकीय सदस्य शंकर बापू तपसे यांची माहिती यांची माहिती

केज : प्रतिनिधी

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली केज मध्ये झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पहिल्याच ऑनलाइन प्रस्ताव पडताळणी समितीच्या बैठकीत केज तालुक्यात २७ हजार ८८२ अर्जाचा समावेश असल्याची माहिती अशासकीय सदस्य शंकर बापू तपसे यांनी दिली आहे.

Advertisement

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज हे सर्व कागदपत्रांसह ३१ ऑगस्टपर्यंत स्वीकारण्यात येणार असून सध्या अर्ज सादर करण्याची व छाननी प्रकिया सुरू आहे.त्रुटीमुळे नामंजूर करण्यात आलेल्या अर्जाची आवश्यक जुटी पुर्ण केल्यानंतर संबंधित सर्व अर्ज मंजूर करण्यात येणार आहेत.नारीशक्ती दुत पवरून व वेब अप्लिकेशन लिंकवर सदरील अर्ज भरावेत.नवीन अर्ज भरण्यासाठी तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळाच्या सव्र्व्हरचे कामकाज सुरू असून दोन दिवसा नंतर या लिंकवर व नारी शक्ती दूतवर अर्ज भरता येणार आहेत. तर नव्याने आलेले अर्ज व ऑफलाईन पध्दतीने शिल्लक असलेले अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरण्याचे काम दोन दिवसानंतर सुरळीत होईल. अशी माहिती ही अशासकीय सदस्य शंकर बापू तपसे यांनी दिली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!