शेकापच्या राज्य चिटणीस मंडळ सदस्यपदी भाई मोहन गुंड यांची निवड !


बीड : प्रतिनिधी

पंढरपूर येथे शेतकरी कामगार पक्षाचे राज्य अधिवेशन संपन्न झाले.या अधिवेशनात शेतकरी कामगाराच्या प्रश्नावर सातत्याने लाल झेंडा घेऊन आवाज उठवणारे,प्रचंड जनसंपर्क असणारे,शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम कराणारा चेहरा म्हणून ओळखले जाते.केजचे भूमीपुत्र भाई मोहन गुंड यांची सर्वानुमते निवड झाल्यामुळे प्रमाणिक कार्यकर्त्याला काम करण्याची संधी पक्षाने दिली आहे.

भाई मोहन गुंड हे जवळपास २००४ पासुन पक्षात सक्रिय आहेत, त्यांनी शेतकऱ्याच्या विविध प्रश्नांवर सतत आवाज उठवत आसतात. शेतकर्यांचे अनेक प्रश्न तडीस लावले आहेत,भाईंच्या निवडी मुळे मराठवाड्यातील शेतकर्यांना एक लढवय्या युवा नेता मिळाला आहे.राज्य शेतकरी,कामगार, विद्यार्थी, अदिवाशी इतर सर्व समावावेशक अनेक ठराव घेण्यात आले,शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ व मध्यवर्ती समिती सदस्यांच्या निवडी ही करण्यात आल्या. पक्षाचे सरचिटणीस म्हणून पुन्हा भाई जयंत पाटील निवड झाली आहे.शेतकरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वीस वर्षांपासून सातत्याने शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून संघर्ष करणाऱ्या केजचे भूमिपुत्र भाई मोहन गुंड यांची राज्य चिटणीस मंडळात नव्याने संधी मिळाली आहे, यामुळे सर्व पक्षातील तळागाळातील कार्यकर्ते पक्षाचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

Advertisement

काल झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात मला पक्षाने राज्य चिटणीस मंडळात घेऊन राज्यभर काम करण्याची संधी दिली,शेतकऱ्यांनी कामगारांची परिस्थिती खालावत चालली आहे. शेतकऱ्याच्या प्रश्नावर मराठवाड्यासह महाराष्ट्रामध्ये मोठी चळवळ उभी करून या लाल झेंड्याच्या माध्यमातून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार,लोकांना आता खरी गरज शेकापक्षाच्या विचारची आहे.

भाई मोहन गुंड

राज्य चिटणीस मंडळ सदस्य शेकाप

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!