पत्रकार अमोल जाधव यांच्या उपोषणाला रमेश गालफाडे यांची भेट !
केज : प्रतिनिधी
Advertisement
केज तालुक्यातील नांदूरघाट येथील निर्भिड पत्रकार तथा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल जाधव हे जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवण्यासाठी नांदुरघाट येथे आमरण उपोषणाला दि.२७ जुलै २०२४ रोजी बसलेले आहेत.यांच्या उपोषणस्थळी केज मतदार संघाचे जेष्ठ नेते रमेश तात्या गालफाडे यांनी भेट देत जाहीर पाठिंबा दिला आणि यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रयत्न करणाऱ्या ग्रामस्थांचे गालफाडे यांनी अभिनंदन केले.गटशिक्षणाधिकारी बेडसकर यांच्या सोबत सविस्तर चर्चा केली व लवकरात लवकर या विषय मार्गी काढावा अशा सूचना दिल्या.यावेळी सामजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर हे उपस्थित होते.