महिती अधिकार कार्यकर्ता महासंघ बीड जिल्हा उपाध्यक्षपदी सुदेश सिरसट
केज : प्रतिनिधी
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष बसवेकर,कार्याध्यक्ष शेखर कोलते यांच्या आदेशाने तसेच माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे बीड जिल्हा अध्यक्ष अजय भांगे,बीड जिल्हा कार्यध्यक्ष नितीन ढाकणे उपाध्यक्ष अँड.हरिभाऊ घाईतिडक,बीड जिल्हा मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे सरचिटणीस मुबशीर खतीब यांच्या मार्गदर्शनाखाली सुदेश दादा सिरसट यांची बीड जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
या निवडी नंतर सुदेश सिरसट यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की,माहिती अधिकार फेरडेशनची संपूर्ण नियम अटी व आचारसंहिता यांचे काटेकोरपणे पालन करून या पदावर जबाबदारीने काम करीन या पदाचा कुठलाही गैर वापर करणार नाही सर्व सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त केले आहे.या निवडीनंतर केज तालुक्यातील मित्र परिवारा कडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.