सरकारने आरक्षणाचा प्रश्न सोडवावा-खा.रजनीताई पाटील


मराठा,धनगर,मुस्लिम आरक्षणासाठी खा.रजनीताई संसदेत आक्रमक

केज : प्रतिनिधी

काँग्रेसचा खासदार ज्येष्ठ नेत्या,राज्यसभेच्या खा.रजनीताई अशोकराव पाटील संसदपटू म्हणून राज्यसभेत प्रश्न मांडत असतात.मराठा आरक्षण,मुस्लिम आरक्षण धनगर आरक्षण प्रश्नावर सरकारने तात्काळ तोडगा काढावा,समाजाला न्याय द्यावा ही मागणी आक्रमक होऊन मांडली.

Advertisement

संसदेत मराठमोळा आवाज बुलंद झाला. मागणीसाठी सर्व समाज आंदोलन,उपोषण करत आहेत त्याकडे दुर्लक्ष करू नये हे सांगून सरकारला या प्रश्नावर निरुत्तर केले.खा.पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरले. सरकारला धारेवर धरणाऱ्या काँग्रेसच्या प्रभावी महिला नेत्या म्हणून त्यांचे नाव आहे.काल संसदेत मराठीतून भाषण करत राज्यात सुरू असलेल्या आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारची त्यांनी कानउघडणी केली.खा.पाटील या नेहमीच अभ्यासूपणे शेतकरी उपेक्षित वंचित घटकांसाठी आवाज उठवत असतात.आरक्षणाच्या प्रश्नावर आवाज बुलंद केल्याबद्दल तीनही समाजाकडून समाधान व्यक्त केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!