खा.सोनवणे यांनी घेतली जरांगे पाटील यांची भेट !
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
छत्रपती संभाजी नगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटल येथे दि.२६ जुलै २०२४ रोजी मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी भेट घेतली. उपोषणाने प्रकृती खालावल्याने त्यांची तब्येत तेवढी चांगली नाही.परंतु हळूहळू त्यात सुधारणा होत आहे.
Advertisement
तब्येतीची काळजी घ्या,असा आग्रह खा.सोनवणे यांनी केला.मनोजदादा लवकरच उपचारानंतर बाहेर पडून समाजाच्या आंदोलनात सक्रिय होतील.दादांची भेट नेहमीच ऊर्जा देणारी असते.यावेळी हॉस्पिटल मधील डॉक्टरांची व स्टाफची भेट घेऊन मनोजदादांवर सुरू असलेल्या उपचारांची खा.बजरंग सोनवणे यांनी माहिती घेतली.