अंबानगरीने केला नव्या खासदारांचा नागरी सत्कार !
पालकमंत्र्यांना लोकसभेतले पाप विधानसभेत फेडावे लागणार ; खा.बजरंग सोनवणे कडाडले
अंबाजोगाई : प्रतिनिधी
सत्ता पक्षांचे नेते,धनशक्ती,सत्तेचा पुरेपूर वापर,दबाव तंत्राचा वापर करून देखील इथे जनतेने सत्तांध शक्तीचा पराभव करून सर्व सामान्य शेतकऱ्याचे पोरग खासदार केले.मी होऊच नये म्हणून जीवाचे रान आणि आकाश पाताळ एक करताना पालकमंत्र्यांनी जातीवाद आणि दबाव सारखे पाप केले.जे विधानसभेत फेडावे लागेल असा दम भरताना सहा मतदार संघात तुतारीचा निनाद होणार असल्याचे सांगितले.नव्या खासदाराचा सत्कार करताना अंबाजोगाई प्रचंड नटली होती,प्रचंड गर्दी उत्साहात बजरंग सोनवणे यांच्या सत्काराला समाज एकवटला.
पालकमंत्री यांनी जे पाप लोकसभेला केले आहे,ते पाप येणाऱ्या विधान सभेला फेडावे लागणार आहेअसे म्हणताना बजरंग सोनवणे यांनी कालच्या सभेत जोरदार प्रहार चढवला.येणाऱ्या काळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आपल्या महविकास आघाडीचे सर्व आमदार निवडून अनायचे आहेत,आपण मला खासदार केले अत्ता आपल्या जिल्ह्याचे राहिलेले काम करण्यासाठी कामे करून कशी घ्यायची ते मी बगतो,अश्या शैलीत आपले भाषण केले,माझ्या सहित जिल्ह्यातील सर्व जनतेला त्रास दिला,त्याचा हिशोब अत्ता विधान सभेला होणार आहे,जाती जाती मध्ये तेढ निर्माण करण्याचे काम बंद करा,मनोज दादाना मला शिव्या देतात त्यांना पाठीशी कोण घालतंय, त्यांना आवर घाला,असा इशाराही खासदारांनी अप्रत्यक्ष पालक मंत्र्यांना लगावला, आलेल्या सर्व निवेदनाच्या कामाचा पाठपुरावा करून मार्गी लावण्याचे काम करणार आहे,जिल्हा परिषदेच्या शाळेच्या दर्जा वाढवण्याचे काम करू,हारवेस्टर व ऊस तोडणी मजुरांचा दर सारखाच कशा होईल याचा ही प्रयत्न करू,बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याचे दरडोई उत्पन्न वाढवण्याचे काम मला करायचं आहे,काटा मारून कारखाना चालवणारी अवलाद माझी नाही,आणि मी कटा मारून कारखाना चालवत असेल तर पालकमंत्र्यांनी 3 वर्ष ऊस माझ्या कारखान्याला दिला कसा असा खोचक सवाल केला.आपण वयाने छोटे आहात,टीका करत असताना विचारून करा,माझे अत्ता सुरू झाले आहे,आपले संपत आले आहे,याचाही विचार आपण करावा,असे ठणकावत बजरंग सोनवणे यांनी पालकमंत्र्यांना उद्याच्या राजकारणात दोन हात करण्याचे आव्हान दिले. केवळ जातीचे राजकारण करून जर कुणाला सत्ता मिळवायची असेल तर इथले सामान्य मतदार हा कावा पूर्ण होऊ देणार नसल्याचे म्हटले.
प्रचार आणि प्रहार
कालचा आवेश प्रचंड आश्वासक होता बजरंग सोनवणे यांनी अगदी निडर भूमिका मांडताना कार्यकर्त्यांना प्रचंड बळ दिले .अंबाजोगाई मला आई सारखी असून विकासात कसूर आणि कसर सोडणार नसल्याचे त्यांनी म्हटले.सभेत मध्ये बजरंग सोनवणे यांनी ज्या आवेशात भावना मांडल्या त्यातून त्यांचा लढवय्या करारी बाणा दिसून आला .
साठे साहेबांनी आपल्या अंदाजात आजची तारीख ही तेरा साथ आहे,आपण अंबाजोगाई करांची साथ कधीही सोडू नये म्हणून आजची तारीख निवडली आहे,आणि बप्पांच्या हाताने गोर गरीबांचे कामे होवेत,अश्या शुभेच्या दिल्या.
प्रथ्वीराज साठे
मा.आ.केज विधानसभाआपल्या मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त भाव खासदारांच्याच कारखान्याने दिला आहे, हार्वेस्टर व ऊसतोड मजूर यांना तोडणीचा भाव सारखाच मिळावा याची मागणी सभागृहात करावी अशी विनंती करून बाप्पांना शुभेच्छा.
कालिदास आपेट
अंबाजोगाईदेश्यामध्ये व महाराष्ट्र मध्ये राहुल गांधी,शरद पवार,उद्धव ठाकरे,यांनी प्रचंड मेहनत घेतली. आपण सर्वांनी लोकसभा निवडणुकीमध्ये परिवर्तन केले तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये ही परिवर्तन करायचे आहे.
राजेसाहेब देशमुख
राष्ट्रीय कांग्रेस पक्ष बीड जिल्हाध्यक्ष