डॉ.अंजली घाडगेची मोर्चेबांधणी सुरू ; गावभेटीवर भर…!
केज : प्रतिनिधी
ऑक्टोंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार असून सर्वच उमेदवार तयारीला लागलेले आहे.सामजिक कार्यकर्ता डॉ.अंजलीताई घाडगे यांनी केज विधानसभेची निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.त्यांनी मतदारसंघामध्ये संपर्क वाढविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू करून गावभेटीवर भर देण्याचे काम सुरू केले आहे.व सामान्य जनतेशी संवाद साधत आहे.यामुळे जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
येत्या ऑक्टोंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुकळे जाणार असून त्या पार्श्वभूमीवर डॉ.अंजलीताई घाडगे यांनी जनसंपर्क वाढवला आहे.घाडगे यांचे मतदार संघातील मतदार व कार्यकर्ते येणाऱ्या विधानसभा निवणुकीत केज मतदार संघातून डॉ.अंजलीताई घाडगे यांना विधानसभेवर पाठवण्याची कार्यकर्त्या व मतदारांमध्ये उत्सुकता आहे.त्यामुळे घाडगे यांनी मतदार संघात गावभेटीवर भर दिला आहे.