धनगर समाजातील चार युवकांचे उपोषण खा.सोनवणे यांच्या मध्यस्तीने स्थगित !


खा.बजरंग सोनवणे यांचे धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश करण्यासाठी संसदेत मांडण्याचे आश्वासन !

केज : प्रतिनिधी

मागील नऊ दिवसा असून धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यात यावा. या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील केकतसारणी तालुका केज येथे चार युवकांनी पाण्याच्या टाकीवर चढून आमरण उपोषण सुरू केले होते. तर एका तरुणाने आत्महत्येचा देखील प्रयत्न केला होता. त्या उपोषणाला खा. बजरंग सोनवणे यांनी भेट देवून त्यांच्या मागणी संदर्भात संसदेत आवाज उठविण्याची आश्वासन दिल्या नंतर अखेर नवव्या दिवशी त्यांचे उपोषण स्थगित करण्यात आले आहे.

Advertisement

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील केकतसारणी येथे धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करून त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे. या मागणीसाठी अनंत धायगुडे, संदीपान धायगुडे, अंकुश मनाडे, महादेव नरवटे या तरुणांनी १ जुलै पासून गावातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलने उपोषण सुरू होते. त्यांच्या उपोषणाला नऊ दिवस झाले असल्याने उपोषणार्थी यांची प्रकृती खालावली होती. मात्र जो पर्यंत सरकार धनगर समाजातील नेत्यांशी चर्चा करून एस टी प्रवर्गात समावेश होत नाही तो पर्यंत उपोषण सुरू राहणार आहे असा त्यांनी पवित्रा घेतला होता. तर या मागणीसाठी अजय शिंदे या तरुणाने उपोषण सुरू असलेल्या पाण्याच्यां टाकीवरून उडी मारण्याचा देखील प्रयत्न केला होता. त्या नंतर अजय शिंदे याने पुन्हा घरातील आडूला गळफास घेतला होता. परंतु सुदैवाने तो सध्या वाचला आहे.

दरम्यान आज दि. ९ जुलै रोजी खा बजरंग सोनवणे यांनी केकेत सारणी येथे जावून उपोषणर्थी यांची भेट घेवून त्यांच्याशी संवाद साधला आणि धनगर समाजाला एस टी प्रवर्गात समावेश करण्यासाठी माहविकास आघाडीचा संसद सदस्य म्हणून संसदेत प्रश्न उपस्थित करून कायम आंदोलनकर्त्या सोबत असल्याचे आश्वासन दिले.
खा. बजरंग सोनवणे यांच्यावर धनगर समाजातील उपोषणार्थी यांनी विश्वास व्यक्त करून उपोषण स्थगित केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!