रमेश गालफाडेची मोर्चेबांधणी सुरू, गावभेटीवर भर…!
केज : प्रतिनिधी
ऑक्टोंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार असून सर्वच उमेदवार तयारीला लागलेले आहे.केज तालुक्याचे भूमिपुत्र रमेश तात्या गालफाडे यांनी केज विधानसभेची निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.त्यांनी मतदारसंघामध्ये संपर्क वाढविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू करून गावभेटीवर भर देण्याचे काम सुरू केले आहे. व सामान्य जनतेशी संवाद साधत आहे.यामुळे जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
येत्या ऑक्टोंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुकळे जाणार असून त्या पार्श्वभूमीवर बहुजन विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष रमेश तात्या गालफाडे यांनी जनसंपर्क वाढवला आहे. गालफाडे यांचे मतदार संघातील मतदार व कार्यकर्ते येणाऱ्या विधानसभा निवणुकीत केज मतदार संघातून रमेश गालफाडे यांना विधानसभेवर पाठवण्याची कार्यकर्त्या व मतदारांमध्ये उत्सुकता आहे.त्यामुळे रमेश गालफाडे मतदार संघात गावभेटीवर भर दिला आहे.