खा.सोनवणे यांचे आदेश काही दिवसातच प्रत्यक्ष मांजरा नदी पुलावरील रस्त्याच्या कामाला सुरुवात
नागरिकांतून खा.बजरंग सोनवणे यांच्या धडाकेबाज कामाचे होते कौतुक
केज :प्रतिनिधी
गेली अनेक वर्ष पासून केज-कळंब दरम्यानच्या मांजरा नदीच्या पुलाचे काम सुरू असलेले काम अद्यापही पूर्ण झाले नसल्याने या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशी व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत होता.याची दखल निवडून येताच खा.बजरंग सोनवणे यांनी घेतली.खा बजरंग सोनवणे यांनी जिल्हाधिकारी व रस्ते विकास महांडळाच्या अधिकाऱ्यांना देताच जुना रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली असल्याने वाहन चालक आणि नागरिकांतून खा बजरंग सोनवणे यांचे अभिनंदन कौतुक होत आहे.
खामगाव सांगोला महामार्ग क्र.५४८-सी या वरील केज ते कळंब दरम्यानच्या मांजरा नदी वरील पुलाचे काम मेगा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी करीत आहे.
दरम्यान मागील अनेक वर्षापासून या पुलाचे काम अर्धवट असल्याने वाहनधारक आणि वाहनचालक यांना व या रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रचंड शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत होता. या बाबत नागरिकांनी अनेकवेळा आंदोलने देखील झालेली आहेत. दरम्यान नवनिर्वाचित खा. बजरंग सोनवणे यांनी निवडून येताच कामाला सुरुवात करीत जिल्हाधिकारी व रस्ते विकास महामंडळाने अधिकारी यांची बैठक घेवून अधिकाऱ्यांना पर्यायी जूना रस्ता दुरुस्तीच्या सूचना दिल्या होत्या आणि जर दुरुस्ती केली गेली नाही; तर या बाबतीत कठोर कार्यवाही करण्याचे सूतोवाच केले होते.त्यामुळे दि. २२ रोजी मांजरा पुलाच्या दुतर्फा असलेल्या जुन्या रस्त्या वरील दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे खा. बजरंग सोनवणे यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.