भारतीय काँग्रेस पक्षाच्या अभूतपूर्व यशाबद्दल खासदार रजनी पाटील यांचा सत्कार
आगामी निवडणुकीत जीवाचं रान करू-दत्ता कांबळे
माजलागाव : प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय काँग्रेस पक्षाला अभूतपूर्व यश मिळत सर्वाधिक १४ खासदार निवडून आले असून, काँग्रेस पक्ष हा राज्यातील अव्वल क्रमांकाचा पक्ष झाला आहे.दि.१७ रोजी अखिल भारतीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्या तथा गांधी परिवाराच्या अत्यंत विश्वासू असणाऱ्या खासदार सौ.रजनीताई पाटील या जिल्हा नियोजन समितीची बैठक व कार्यकर्त्यांच्या भेटी गाठीचे औचित्य साधून जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या.
यावेळी महाराष्ट्रातील भारतीय काँग्रेस पक्षाच्या अभूतपूर्व यशाबद्दल जिल्हा काँग्रेस तथा अखिल भारतीय काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या खासदार सौ. रजनीताई अशोकराव पाटील यांचं भारतीय काँग्रेस अनु जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा परळी विधानसभा मतदार संघांचे निरीक्षक दत्ता कांबळे यांनी प्रमुख सहकार्यांच्या समवेत केज येथील “शिवनेरी” निवासस्थानी गुलाब पुष्पहार सह ह्रदय सत्कार केला.यावेळी खासदार रजनीताई पाटील यांनी कॉग्रेस अनु जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कांबळे यांनी जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी घेतलेले परिश्रमाचे आणि सर्वांगीण राजकीय पैलूवर लक्ष वेधत दत्ता कांबळे यांचे भरभरून कौतुक केले. यावेळी निवडणुकाच्या पार्शवभूमीवर चर्चा करत असताना परळी विधानसभा मतदार संघांचे निरीक्षक दत्ता कांबळे यांनी आगामी निवडणूक काळात खासदार सौ. रजनीताई पाटील,माजी मंत्री अशोकराव पाटील, जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जीवाचं रान करू अशी ग्वाही खासदार रजनीताई पाटील यांना दिली. यावेळी जिल्हा काँग्रेसचे नेते आदित्य पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राहुल सोनवणे पाटील, अनंत घडसिंगे,नानासाहेब कसबे,संकेत कासार सह कार्यकर्ते उपस्थित होते.