औसा येथे बकरी ईद उत्साहात साजरी


अमन-सुख,शांती व मानवी कल्याणासाठी दुआ…

औसा प्रतिनिधी : एम बी मणियार

औसा,दि.१७ : तालुक्यासह शहरातील मुस्लिम बांधवांनी पवित्र रमजान ईदच्या नंतर ६७ दिवसांनी साजरा करण्यात येणारे सण म्हणजे ईद-उल- अजहा (बकरी ईद) हा सण त्याग, समर्पण आणि कर्तव्यभावनेची शिकवणूक देणारा असून हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Advertisement

पावसाळा सुरू असल्याकारणाने शहर काझी मीर मुजम्मील अली काझी यांनी ईद उल अजहाची नमाज पठण करण्याकरिता पावसाचे अंदाज घेत शहरातील काही मशिदीत नमाज पठण करण्या करिता आवाहन केले होते. पण बकरी ईद ची नमाज पठण करण्याकरिता तालुक्यासह शहरात प्रतिवर्षाप्रमाणे दि. १७ जून २०२४ सोमवार रोजी मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधवांनी ‘ईद-अल-अज़हा (बकरी ईद)’ सणानिमित्ताने नमाज पठण करण्यासाठी (दि. १७ जून) सोमवार रोजी पावसाने थोडीशी उघडदीप दिल्याने, येथील किल्ला मैदान परिसरातून सकाळी ०८ : ०० वाजता एका भव्य रॅलीने निघून खाकी शफा दर्गा येथील ईदगाह मैदानावर नमाज पठण करण्यासाठी ०९ : ०० वाजता पोहचून जागतिक स्तरावरचे प्रवचनकार काझी मीर हशमतअली यांनी ईदची नमाज पठण केली, तर ईदचा बयान (प्रवचन) बरोबर तसेच ‘सामाजिक सलोख्याबरोबर अमन सूख-शांती व मानवी कल्याणासाठी’ दुवा करत म्हणाले की, इस्लाम मध्ये धोखाधडी, खोटे बोलणे, जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना महत्व नाही. तुम्हाला जर कुणामुळे त्रास होत असेल तर त्याचा विरोध करण्यापेक्षा त्याच्या विधात्यालाच राजी करा. तो आपोआप संपतो. कारण जो कुणी अल्लाहवर विश्वास ठेवतो. त्याला कुणालाही घाबरण्याची गरज नाही. तुमच्यावरील सर्व संकट तो नाहीसे करतो. मात्र तुम्ही ईश्वराशी एकनिष्ठ असणे गरजेचे आहे. यावेळी तालुक्यासह शहरातील मुस्लिम बांधवासह लहान मुले, तरुण, वृद्ध उपस्थित होते. रमजान ईद नंतर ७० दिवसांनी बकरीद ईदचा सण उत्साहात साजरा करतात. मुस्लिम कॅलेंडर प्रमाणे’ दु-अल-हजच्या १० व्या दिवशी हा सण साजरा करण्यात येतो. इस्लामिक मान्यतेनुसार हजरत इब्राहिम अलै. खुदाच्या (ईश्वर) आदेशाने खुदाच्या (ईश्वर) मार्गावर आपला मुलगा हजरत इस्माईल अलै.ची कुर्बानी देण्यासाठी जात असताना अल्लाहने हजरत इब्राहिम अलै. च्या त्याग व प्रामाणिकपणावर प्रसन्न होऊन त्यांच्या मुलाचे प्राण माफ केले होते. मुला ऐवजी एका बकऱ्याची कुर्बानी दिली गेल्याने ह्या सणाला बकरी ईद म्हटले जाते. औसा येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्या साठी शहरातील प्रतिष्ठित नागरिका सह अनेक मान्यवर उपस्थित होते. हजारो मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर नमाज पठणानंतर एकमेकांना आलिंगन देण्यासाठी गर्दी केली व शहरातील मान्यवरांनी शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली होती.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!