खा.बजरंग सोनवणेंनी डीपीसीची पहिलीच बैठक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गाजवली !


२०२०-२१ पिकविम्याच्या मुद्यावरून सोनवणे आक्रमक ; ती रक्कम तातडीने देण्याची मागणी.

बीड : विकास अंगरखे

बीड जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.यावेळी नवनिर्वाचित खा.बजरंग सोनवणे यांनी सन २०२०-२१ मध्ये जिल्ह्यातील तीन तालुक्यात पिक विमा  मंजूर झाला होता,त्याचे पैसे सर्व शेतकऱ्यांना मिळाले नसल्याचा मुद्दा उपस्थित करून पहिलीच जिल्हा नियोजन समितीची बैठक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गाजवली.

Advertisement

२०२४-२५ साठी सुमारे ५४५ कोटी ४९ लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. यामध्ये सर्वसाधारण योजनेसाठी ४१४कोटी,अनुसूचित जाती योजना साठी १२९ कोटी, तर ओटीएसपी योजनासाठी दोन कोटी ४९ लाख रुपये इतका निधी आरक्षित करण्यात आलेला आहे.बैठकीस पालकमंत्री धनंजय मुंडे, खा.रजनीताई पाटील,आ.प्रकाश सोळंके, आ.सुरेश धस, आ.बाळासाहेब आजबे, आ.संदीप क्षीरसागर,आ.नमिता मुंदडा, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे,पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.बैठकीच्या सुरूवातीलाच खा.बजरंग सोनवणे यांनी शेतीच्या संदर्भाने विषय मांडण्यास सुरूवात केली.सन २०२०-२१ मध्ये जिल्ह्यातील बीड,गेवराई आणि वडवणी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पिक विमा मंजूर झाला होता मात्र,मंजूर पिक विमा मधील रक्कम सर्व शेतकऱ्यांना मिळालेली नाही,असा मुद्दा मांडला.यावर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सर्व शेतकऱ्यांना रक्कम मिळाली,असे म्हटल्यानंतर अधिकाऱ्यानी काही शेतकरी राहिले असून निधी उपलब्ध झाला नसल्याचे स्पष्ट केले.याच बरोबर जिल्ह्यात वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे.सदरील नुकसान टाळण्यासाठी त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. महिला सबलीकरणासाठी जास्तीचा निधी देणे आवश्यक असून या विषयाकडे गांभिर्याने पहावे, बीड जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळला आहे.सदरील शेतकऱ्यांना वेळेत पिककर्ज उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे.ज्या ठिकाणी बँका शेतकऱ्यांची आडवूणक करत आहेत,अशा ठिकाणी बँक अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, ज्याठिकाणी बँकाचे अधिकारी चांगले काम करत आहेत,अशांचा सत्कारही करू.परंतू शेतकऱ्यांना विना अडथळा कर्ज मिळाले पाहिजे,यासाठी प्रयत्न करू,जिल्हा परिषद इमारतीच्या परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासह महापुरूषांचे पुतळे उभारण्यासाठी निधी द्यावा,अशी मागणीही त्यांनी यावेळी लावून धरली.पहिल्याच बैठकीत खा.बजरंग सानवणे यांनी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवून आपण शेतकरीपुत्र असल्याचे दाखवून दिले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!