केज उपजिल्हा रुग्णालय अधिक्षक लागले पुरस्कार शिफारस विकायला ?
जिल्हा शल्यचिकीत्सकानी चौकशी करण्याची मागणी
केज : प्रतिनिधी
प्रत्येक वर्षी आरोग्य विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या परिचारीकांना फ्लोरेन्स नाईटिंगल पुरस्कार देऊन गौरव केला जातो.या साठी जिल्हा,ग्रामीण,उपजिल्हा रुग्णालयातून परिचारिकांना पुरस्कार दिला जातो.ज्या रुग्णालयात उत्कृष्ट काम केले जाते अश्या परिचारीकाना हा पुरस्कार दिला जातो यांची शिफारस त्या रूगणालयातील वैद्यकीय अधीक्षक व मेट्रंन हे परिचारीकांचा वर्ष भराच कामाचा अहवाल बघून शिफारस देतात त्या नंतर ते कमिटी कडे पाठवतात त्यातून त्या परिचारिकांना पुरस्कार दिला जातो.
पण केज रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांना याचा विसर पडला का काही वेगळ्याच अर्थपूर्ण पुर्ण सहकार्यातून व बाकी त्यांच्या कामा कडे म्हणजे ते रूगणालयात काय काम करतात आठ घंट्याची डियुटी असताना किती घंटे करतात.या कडे दुर्लक्ष करून शिफारस केली.कारण केज उपजिल्हा रुग्णालयात दिवस-रात्र सेवा देणाऱ्या अपघात विभाग,प्रस्तुती विभाग,शस्त्रक्रिया विभाग,लसीकरण विभाग,असे किती तरी विभागात आठ,आठ घंटे काम करणारे अधिपरीचारारिका असताना दिवसात फक्त दोन,तीन घंटे काम करून कधी वार्डात काम न करणाऱ्या परिचारीकांनची शिफारस केली जाते व त्यांना पुरस्कार दिला जातो तो ही एक वेळेस नाहीतर तर दोन दोन वेळेस.
गेल्या वर्षी ज्या अधिपरीचारीकांना हा पुरस्कार भेटला त्यानांच पुन्हा या वर्षी वैद्यकीय अधीक्षक शिफारस करतात व त्यांनाच हे पुरस्कार भेटत असल्याने. या पुरस्काराकडे संशयाने पाहिले जात आहे.वैद्यकीय अधीक्षक जर आपल्या कर्मचाऱ्यांना न्याय देत नसतील तर कर्मचारी कसे प्रोत्साहित होतील.जर असे विकून शिफारशी जर वैद्यकीय अधीक्षक देत असतील तर खरे इमानदारीने आठ घंटे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर अन्याय नाही का ? केज येथील उपजिल्हा रुग्णालयातील दिलेल्या शिफारसीची आता जिल्हा शल्यचिकीत्सकाने चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी आता केज रुग्णालयातील कर्मचारी दबक्या आवाजात चर्चा करत आहेत कारण प्रशासनाच्या विरोधात जायचे तर त्यांच्या हातात वार्षिक गोपिनीय अहवाल असतात.त्यामुळे सहसा कर्मचारी वरिष्ठांच्या पुढे जात नाहीत म्हणूनच वरिष्ठ आपल्या मर्जीतील हुजरेगिरी,कामचुकार लोकांची शिफारस करतात व असे लोक पुरस्कार घेतात.अश्या अर्थपूर्ण शिफारस करणाऱ्या व सलग दोन वर्षांपासून हा पुरस्कार घेणाऱ्या अधिपरीचारीकांची जिल्हा शल्यचिकीत्सका मार्फत चौकशी करावी अशी मागणी कर्मचारी करत आहेत.