सोनवणे यांना खासदार करण्यासाठी बीड जिल्ह्यात रमेश गालफाडे ठरले किंगमेकर !
बीड : प्रतिनिधी
बहुजन विकास परिषदेने एकदिलाने बीड लोकसभेचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना सर्व प्रथम जाहिर पाठिंबा देऊन संपूर्ण बीड जिल्हा पिंजून काढला व चार तारखेला अखेर बजरंग सोनवणे यांना गुलाल लागला.सोनवणे यांच्या विजयाच्या वाट्यात बहुजन विकास परिषदचे संस्थापक अध्यक्ष रमेश गालफाडे बीड जिल्ह्यात किंगमेकर ठरले आहेत.
महाविकास आघाडीला बीड जिल्ह्यात पाठींबा देऊन ठीक-ठिकाणी बैठक,प्रचार,सभा,गाजवत बीड लोकसभेसाठी लक्ष घालून रमेश गालफाडे स्वतः व बहुजन विकास परिषदची पूर्ण ताकद बजरंग सोनवणे यांच्या मताच्या वाट्यात भर टाकण्यात यशस्वी झाली.रमेश गालफाडे योग्य प्लॅनिंग लावून व बहुजन विकास परिषदची सर्व टीम अत्यंत संयमाने हा विजय खेचून आणण्यात रमेश गालफाडे व त्याची सर्व टीम अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.बीड लोकसभेचे वातावरण सुरुवातीपासूनच तापलेले होते.राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बीड लोकसभा उमेदवार बजरंग सोनवणे यांचा विजय निश्चित होण्यासाठी बहुजन विकास परिषदचे संस्थापक अध्यक्ष रमेश गालफाडे यांनी बीड जिल्ह्यातील गेवराई,पाटोदा,केज, बीड, अंबाजोगाई,नेकनूर,शिरूर का,परळीसह ग्रामीण भागात डोर टू डोर तगडी प्रचार यंत्रणा राबविली होती.बजरंग सोनवणे यांना उमेदवारी घोषित झाल्यापासून रमेश गालफाडे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत होते.निवडणूक संदर्भात त्यांनी मतदारांशी वारंवार चर्चा आणि भेटी घेऊन विजयाचे रणसिंग फुंकले होते.कुणाच्याही दबावाला आणि षडयंत्राला भीक न घालता तगडी प्रचार यंत्रणा राबवून बजरंग सोनवणे यांचा विजय खेचून आणण्यासाठी रमेश गालफाडे बीड जिल्ह्यात किंगमेकर ठरले आहेत,असेच म्हणावे लागेल.जिल्हाभरातील मातंग समाजाची ताकद बजरंग बप्पाच्या पाठीशी लावण्यात रमेश गालफाडे यशस्वी ठरले आहेत.गालफाडे यांनी गेवराईत बहुजन विकास परिषदेचा निर्धार मेळावा ठेवला होता.त्या निर्धार मेळाव्यात हजाराेंंच्या संख्येने मातंग समाज बांधवांची उपस्थिती लावली होती व गालफाडे यांनी सोनवणे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब निर्धार मेळ्यात केला होता. तसेच बहुजन वि.परिषदेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्याचे कौतुक रमेश गालफाडे यांनी बजरंग सोनवणे विजयी झाल्यानंतर केले. जाती-पातीच्या राजकारणाला आणि कोणत्याही आमिषाला,भूलथापांना बळी न पडता बजरंगबप्पांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी जिल्हाभरातील मातंग समाज एकवटला होता.त्यामुळे बजरंग बप्पा सोनवणे यांचा विजय निश्चित झाला असे रमेश गालफाडे यांनी म्हटले.