सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर
केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल
एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी
एका आरोपीला पुण्यातून केली अटक
गौतम बचुटे : केज
सोशल मीडियावर सामाजिक तणाव निर्माण करणाऱ्या पोस्ट तालुका कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या असामाजिक घटका बाबत केज पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. आता पर्यंत केज पोलीस ठाण्यात एकूण सहा गुन्हे दाखल झाले आहेत तर एका आरोपीला पोलीस पथकाने पुण्यातून ताब्यात घेतले असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
केज तालुक्यातील बेलगाव येथील अविनाश दातार याने भाजपाच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या बाबत एका गाण्यावर आक्षेपार्ह शब्द वापरून हावभाव बदनामीकारक व दोन समाजात तेढ निर्माण करणारा व्हिडिओ इंस्टाग्रामवर प्रसारित केला होता. त्याची पोलिसांना माहिती मिळताच त्याच्या विरूद्ध पोलीस ठाण्यात गु. र. न. ३१०/२०२४ भा दं वि. ५०५(२), ५०९, १५३(अ) यासह माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम ६६ आणि ६७ नुसार गुन्हा दाखल करण्यात होता. दरम्यान गुन्हा दाखल होतात केज पोलिसांनी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग यांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तसेच लाडेगाव तालुका केज येथील अमोल रघुनाथ शेप यांने सोशल मीडियावर एखादी न घडलेली घटना ती घडली आहे अशी सोशल मीडियावर अफवा पसरवून सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्या बद्दल त्याच्या विरुद्ध के ज पोलीस ठाण्यात गु.र.न. ३१५/२०२४ भा दं.वि. ५०५(२), १५३(अ) या सहमाहिती व तंत्रज्ञान कायदा कलम 66 आणि 67 नुसार गुन्हा दाखल करण्यात होता दरम्यान गुन्ह दाखल होतात केज पोलिसांनी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल शेप याला ताब्यात घेतले आहे.केज तालुक्यात मागील काही दिवसापूर्वी सोशल मीडिया च्या माध्यमातून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल झाल्यामुळे नांदूरघाट येथे तणाव निर्माण झाला होता. तर एका गावात विशिष्ट समाजाच्या दुकाने आणि हॉटेल्सवर बहिष्कार टाकण्याची पोस्ट व्हायरल झाल्याने तालुक्यात तणाव निर्माण झाला होता. हा प्रकार शांत होतो ना होतो तोच पुन्हा एकदा अशा पोस्ट व्हायरल होत असल्यानेच केज पोलीस सतर्क झाले आहेत.
एका आरोपीला पुण्यातून घेतले ताब्यात !
इंस्टाग्रावर आक्षेपार्ह व्हिडिओ टाकणारा आरोपी अविनाश दातार याला पुणे येथून पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग आणि महादेव बहिरवाळ व मुंडे यांनी ताब्यात घेतले.
————————————————–पोलिसांना गुंगारा देवून पळून जाणारा आरोपी घेतला ताब्यात
सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणारा आरोपी अमोल शेप याला चौकशी साठी पोलीस ठाण्यात बोलविले असताना त्याने पोलिसांना गुंगारा देवून पळून जा प्रयत्न केला होता परंतु पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
“सोशल मीडियावर कुठलाही प्रकारच्या वादग्रस्त अथवा दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट करू नयेत. अशा वादग्रस्त पोस्ट करणाऱ्यावर कठोर कारवाही केली जाईल.”
प्रशांत महाजन,
पोलीस निरीक्षक, केज