कुणबी मराठा महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी रोहन गलांडे
समाज सेवेची दखल घेत करण्यात आली निवड
केज : प्रतिनिधी
अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य रोहन गलांडे पाटील यांनी आतापर्यंत निस्वार्थपणे केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रल्हाद गुळमिले पाटील यांच्या सूचनेवरून व बीड लोकसभा अध्यक्ष रमेश साखरे यांच्या सुचनेनुसार अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघाच्या केज तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली रोहन दादा गलांडे पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघाच्या माध्यमातुन समाजातील विविध प्रश्न लोकशाही मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न करत अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघाची विचारधारा व कार्यपध्दती यशस्वीपणे पार पाडेल असे मत रोहन गलांडे पाटील यांनी व्यक्त केले तसेच संघाच्या निवड पत्रात असे म्हटले आहे की अपेक्षा करत सदर नियुक्ती ही नियुक्ती दिनांकापासुन एक वर्षाच्या कालावधीसाठी असेल.अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघाचे नियम व अटीच्या अधिन राहुन आपण काम करेन असे रोहन गलांडे पाटील यांनी म्हटले आहे तरी रोहन गलांडे पाटील यांचे विविध स्तरांवरुन अभिनंदन करण्यात येत आहे तरी रोहन गलांडे यांनी असे म्हटले आहे की सकल मराठा समाजा साठी तीळ भर आजपर्यंत समाजासाठी काम करत अलेलोच आहे, आणि इथून पुढेही करतच राहणार,समाजासाठी कधीही हजर राहणार, तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवून मला अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य केज तालुकाध्यक्ष पद देवून माझ्यावर जबाबदारी टाकली आहे, त्या जबाबदारीला कर्तव्य समजून सकल मराठा समाजसाठी कामकरणार हे आज मी सकल मराठा समाजला वचन देतो. तुम्ही माझ्यावर प्रेम दाखवल त्याबद्दल अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आभारी आहे असे रोहन गलांडे पाटील यांनी म्हटले आहे.